Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
अ.नगरक्राईम

श्रीरामपुरात एकाने पोस्टाने मागवले हेरोईन गुप्त माहिती मिळताच पोलीसांनी केले जेरबंद

One ordered heroin by post in Srirampur After receiving secret information, the police arrested him

गुवाहाटी इथून टपाल सेवेद्वारे एक पार्सल श्रीरामपूर डाक कार्यालयात येणार असून त्यामध्ये अंमली पदार्थ असण्याची शक्यता एनसीबी मुंबई कार्यलयानं वर्तवली होती. ही माहिती पार्सल नंबरसह अहमदनगर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस आणि एनसीबी पथकानं डाक विभागाशी संपर्क करुन वार्ड क्रमांक 7 मधील

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

बीटवर असणाऱ्या महिला पोस्टमनला या कारवाईत सहभागी करुन घेत मोठ्या शिताफीन पार्सल मागणी करणाऱ्याला शोधून काढलं. त्यानंतर पार्सल ऑर्डर करणारा आरोपी विक्रांत राऊतला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

यासंबंधी अधिक तपासणी करत असताना पोलिसांनी आरोपीचे ऑनलाइन नेटवर्क तपासलं असता, क्रिप्टोकरन्सीमध्ये पैशाची देवाण-घेवाण करुन संबंधीत अंमली पदार्थ ऑर्डर केल्याची माहिती समोर आली.

अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी कुरीअर आणि पोस्टाच्या सेवेचा गैरफायदा केला जात असल्याची विधीमंडळ अधिवेशनात राज्य गृह विभागानं अगोदरच कबुली दिलीय. राज्यभर अंमली पदार्थाचं जाळ पसरलं असून आता नगर जिल्ह्यात देखील अशा पद्धतीनं परराज्यातून ड्रग्ज ऑर्डर केल्या जात असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.

ऑनलाइन ड्रग्ज आणि सोशल मीडियामुळं अवघं जग हातात आल्यानं गुन्हेगारीकडं झुकणाऱ्या श्रीरामपुरात असे किती जण ड्रग्जच्या आहारी गेलेत आणि याचं लोन कसं पसरतंय हे तपासण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button