Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरक्राईम

निलेश लंके यांनी पोलिसांच्या भ्रष्टाचाराची मटकी फोडली आम्ही त्याचा पापाचा घडा कायद्याने फोडणार जितेश लोकचंदानी 

निलेश लंके यांनी कालपासून  जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषणाला प्रारंभ केले. प्रारंभी भ्रष्टाचाराची मडकी घेऊन उपोषणकर्ते मोर्चाने पोलीस अधीक्षक कार्यालयात समोर दाखल झाले होते. यामध्ये महाविकास आघाडीतील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाकडून त्रस्त झालेल्या नागरिकांनी देखील सहभाग नोंदवला.आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूवपात मडकी फोडतोय, भ्रष्टाचाराचा पापाचा मडका आता भरलेला आहे, आजपासून ते फोडायला आम्ही सुरवात करतोय, या हप्त्यांचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावे लागत आहे, कोणतेही काम पैशाशिवाय होत नाही, याला वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही – खासदार निलेश लंके यांनी सांगितले 

sai nirman
जाहिरात

पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीवर आरोप करत खासदार लंके यांनी उपोषण सुरू केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या वेळी विरोधकांवर गंभीर आरोप केले.

ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे विक्रम राठोड आदी उपस्थित होते. हरिभाऊ आहेर (खोसपुरी), मंदा पागिरे, प्रियंका गायकवाड, सरफ सुवर्णकार संघटनेचे प्रकाश लोळगे आदींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.

DN SPORTS

लोकसभा निवडणुकीच्या काळात माझा मोबाईल ट्रेस केला, सीडीआर काढले, फोन रेकॉर्ड करण्यात आला, काहींनी पोलिसांनी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तर त्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांची फोनही टॅप केले जातात, असाही आरोप खासदार लंके यांनी केला. अवैध वाळू, अवैध धंदे, जुगार सर्रास सुरू आहेत. जुगारामुळे युवक आत्महत्या करत आहेत. नागरिकांच्या याबद्दल वाढत्या तक्रारी आहेत, असे खासदार म्हणाले.

kamlakar

खूपच विशेष वाटते कि आहिल्यानगरचे पोलीस राजरोसपणे हफ्ते जमा करीत आहेत कायद्याला पायदळी तुडवीत मनमानी करून बदल्या झालेल्या असतांना आहे त्याच ठिकाणी पोलिसांना ठेवतात आपल्या पदाचा गैरवापर करून वकिलांना मारहाण करणे आपले पितळ उघडे पडेल म्हणून पत्रकारांना मारहाण करणे  मर्जीतल्या लोकांना मर्जीचा ठिकाणीच ठेवणे याची अनेकदा तक्रार करूनही वरिष्ठ याची दखल घेत नाही म्हणून आहिल्यानगराचे पोलीस आपल्या खाकीचा दुरुपयोग करून नंगानाच करीत असल्याची स्वता खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री पासून वरिष्ठ संबंधित अधिकारी यांना तक्रार करूनही शासन व कुठलेही खाते ह्या पोलिसांवर कारवाई करीत नाही आणि त्या खासदाराला आमरण उपोषण करावे लागते हि किती शरमेची बाब आहे वरिष्ठ अधिकारी कारवाई करीत नाहीत याचा अर्थ वरिष्ठांनाही मलिदा पोहोच होत असेल असे जनतेला वाटायला लागले आहे  एका खासदाराने तक्रार करून सुद्धा हफ्तेखोर पोलिसांवर कारवाई होत नाही 

यावरून लक्षात येते कि गृहविभाग आणि पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी हे किती दक्ष आहेत  पोलीस महासंचालक यांनी पदभार घेताच सांगितले होते कि काही पोलिसांनी खात्याची प्रतिमा मालिन केली आहे

 मग त्याच कर्तव्यदक्ष पोलीस महासंचालक यांना नगर येथील पोलिसांची तक्रार प्राप्त झाल्यावर कारवाई का केली नाही  का शासन ह्या हफ्तेखोर पोलिसांना पाठीशी घालत आहेत असे अनेक आरोप होतांना दिसत आहे  पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ज्यादिवसा पासून जिल्ह्याचा चार्ज घेतला आहे त्यादिवसा पासून अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी अवैद्य व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत

कारण कि ओला हे ह्याआधी नगर जिल्ह्यात कार्यरत होते त्यांना येथील सर्व अवैद्य व्यवसायाची चांगल्या प्रकारे माहिती होती आणि त्यांनी पदभार स्वीकारल्या नंतर जे अवैद्य व्यवसाय बंद होते आणि काही अवैद्य व्यवसाय लपून चालू होते ते आज राजरोसपणे सुरु आहेत आणि याची तक्रार करून वरिष्ठ अधिकारी दखल घेत नाहीत तेव्हा सर्वसामान्य लोकांनी न्याय मागायचा कोणाकडे हा प्रश्न नगर करांना पडला आहे 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button