Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरक्राईम

शिरूरमध्ये मध्यरात्री कारवाई – MD ड्रग्जसह आरोपी जेरबंद-दिनेश आहेर प्रकरणाची पुनरावृत्ती तर नाही ना?

पुणे / अहिल्यानगर | विशेष प्रतिनिधी
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिरूर परिसरात केलेल्या २ कोटी १० लाख रुपयांच्या मेफेड्रोन (MD) ड्रग्ज जप्तीच्या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल हादरून गेले आहे.
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, या काळ्या धंद्याचे धागेदोरे थेट अहिल्यानगर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचल्याचा आरोप समोर आला आहे.
या प्रकरणी श्याम गुजर नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याने,
“रक्षकच भक्षक?” असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिरूरमध्ये मध्यरात्री कारवाई – MD ड्रग्जसह आरोपी जेरबंद
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम सुरू होती.
दि. १८ जानेवारीच्या मध्यरात्री, शिरूर तालुक्यातील बाबुरावनगर परिसरातील एका मोकळ्या मैदानात छापा टाकण्यात आला.
या कारवाईत शादाब रियाज शेख (वय ४१, व्यवसाय – गॅरेज चालक) याला रंगेहात पकडण्यात आले.
त्याच्याकडून १ किलो ५२ ग्रॅम मेफेड्रोन (MD) एक दुचाकी
असा एकूण २ कोटी १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसाचं नाव येताच यंत्रणा हादरली
अटक केलेल्या शादाब शेखची कसून चौकशी केली असता,


या ड्रग्ज रॅकेटमध्ये अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका शाखेत कार्यरत असलेला कर्मचारी श्याम गुजर याचा सहभाग असल्याचा दावा त्याने केल्याची माहिती पुढे आली.
त्यानंतर पुणे ग्रामीण LCB ने मंगळवारी (२० जानेवारी) सायंकाळी श्याम गुजर याला ताब्यात घेतले.
ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात खाकी वर्दीतील व्यक्तीचे नाव पुढे येणे हे अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणे मानले जात आहे.


नगर LCB वर लक्ष द्यावे – इतिहास पुन्हा घडू नये!
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यापूर्वीही LCB मधीलच दिनेश आहेर प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात पोलिसांची प्रतिमा मलीन झाली होती.
त्या काळात दिनेश आहेरच्या हफ्तेखोरी व भ्रष्टाचाराच्या विरोधात खासदार निलेश लंके यांना आमरण उपोषण करावे लागले होते,


आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोलिस यंत्रणेवर “थू-थू” होण्याची वेळ आली होती.
आज पुन्हा एकदा
ड्रग्ज तस्करीत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव समोर येणे,
हा तोच काळा इतिहास पुन्हा उघडण्याचा इशारा नाही ना?
असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
पोलीस अधीक्षक घार्गे साहेबांनी वेळीच हस्तक्षेप करावा
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. घार्गे साहेबांनी
या संपूर्ण प्रकरणात नगर LCB वर विशेष लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे.


जर वेळीच
अंतर्गत चौकशी
संशयास्पद कर्मचाऱ्यांची  छाननी
ड्रग्ज रॅकेटशी संबंधित पोलीस दुव्यांचा पर्दाफाश
झाला नाही, तर
LCB ची प्रतिमा पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात बदनाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


जनतेचा सवाल
ड्रग्ज माफियांवर कारवाई करणारी यंत्रणा
जर आतूनच पोखरली जात असेल,
तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे?
खाकी वर्दी ही संरक्षणाचे प्रतीक आहे,
ती ड्रग्ज माफियांची ढाल बनू नये,
हीच आज जनतेची ठाम अपेक्षा आहे. म्हणून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलीस निरीक्षक यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button