राजुर (प्रतिनिधी):
शेतकऱ्यांना “नवीन ट्रॅक्टर घेऊन देतो, डाऊन पेमेंट मी भरतो, सहा महिन्यांचा हप्ता मी देतो” असे गोड आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश राजुर पोलिसांनी केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल ९ ट्रॅक्टर व २ मोटारसायकल मिळून ७१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

😱 ‘ट्रॅक्टर घेऊन देतो’ म्हणत घेतले कागदपत्र, आणि…
फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भालचंद्र अशोक साळवी (रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि त्याचे साथीदार यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला.
“तुमच्या नावावर ट्रॅक्टर काढून देतो, डाऊन पेमेंट मी भरतो, सहा महिन्यांसाठी ट्रॅक्टर कामाला दे मी तुला दरमहा ३०,००० रुपये देतो,” असे सांगून त्यांनी फिर्यादीचे आधारकार्ड, पॅनकार्ड, पासबुक, शेतीचे उतारे घेऊन L&T फायनान्स कंपनीतून कर्ज काढले.
दि. ०४/०६/२०२५ रोजी श्रीरामपूर येथील महाकाली शोरूम मधून ट्रॅक्टर घेऊन दिल्यानंतर आरोपींनी तो दि. ०६/०६/२०२५ रोजी स्वतःच्या ताब्यात घेतला आणि ठरलेले पैसे देणे बंद केले.
फोन बंद, संपर्क तुटला — आणि शेतकरी अडचणीत!
📜 राजुर पोलिसांकडे गुन्हा दाखल
फिर्यादींनी या फसवणुकीबाबत दि. २९/१०/२०२५ रोजी राजुर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.न. ४०१/२०२५, भा.दं.वि. कलम ४१६(२), ४१८(४) प्रमाणे गुन्हा नोंदवला.
त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे (श्रीरामपूर) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तांत्रिक तपास सुरु करण्यात आला.
🚓 अनेक जिल्ह्यांत छापे – मोठा सापळा यशस्वी
तपासात समजले की आरोपी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार येथे नेहमी ये-जा करत असतो. पाळत ठेवली असता दि. ०४/११/२०२५ रोजी तो अहिल्यानगर येथे आल्याचे समजल्याने
भालचंद्र साळवी व अभिजित सुनिल भांडवलकर (वय ३२, रा. सिव्हिल हाडको, अहिल्यानगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल करत सांगितले की त्यांनी सदर ट्रॅक्टर करण राजपूत (रा. सिल्लोड, जि. संभाजीनगर) यास ४ लाख रुपयांत विकला होता.
याशिवाय त्यांनी अशाच पद्धतीने इतर ९ शेतकऱ्यांची फसवणूक करून ९ ट्रॅक्टर आणि २ मोटारसायकली विकल्या असल्याचेही कबूल केले.
🚜 ९ ट्रॅक्टर, २ मोटारसायकली जप्त
पोलिसांनी तात्काळ वेगवेगळी पथके तयार करून शिर्डी, अहिल्यानगर, श्रीगोंदा, नारायणगाव (जुन्नर), सिन्नर (नाशिक) या ठिकाणी छापे टाकले आणि सर्व वाहनं ताब्यात घेतली.
या कारवाईत एकूण ७१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
👮♂️ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व कारवाईत सहभागी पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुणाल सोनवणे (संगमनेर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पथकात पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.हे.कॉ. सचिन धनाड, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र विरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढे,
पोहेकॉ दत्तात्रय मेंगाळ, पो.ना. वापुसाहेब हांडे, पोकों राहुल सारवंदे, स.पो.नि. दिपक सरोदे (राजुर पोलीस स्टेशन),
तसेच शिर्डी, श्रीगोंदा पोलिसांचे अधिकारी सहभागी होते.
🔹 राजुर पोलिसांचा सतर्क तपास — टोळीचा पुढील शोध सुरू
राजुर पोलिसांनी या टोळीतील उर्वरित साथीदारांचा शोध सुरू ठेवला असून फसवणुकीच्या अशा अनेक प्रकरणांचा तपास गतीमान करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षतेचे आणि पोलिसांच्या तांत्रिक कौशल्याचे प्रतीक ठरली आहे.