Letest News
विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन गुटखा तस्करांवर एलसीबीची वक्रदृष्टी शिर्डीत एकाच रात्री तीन गुन्हे दाखल! दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव... साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा...
क्राईमशिर्डी

साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका

जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डीतील साईमंदिर परिसरात, भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेत स्वतःच्या अल्पवयीन मुलांकडून भिक्षा मागवून व वस्तू विक्री करून घेणाऱ्या पालकांवर प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. या विशेष शोध मोहिमेत १० मुले व ४ मुली अशा १४ बालकांची सुटका करून त्यांना सुरक्षिततेसाठी बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


😔 पैशासाठी पोरं, शिक्षणावर कुऱ्हाड
दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. मंदिर परिसरात फोटो, मूर्ती, हार-फुले, प्रसाद विक्री, कपाळावर गंध लावणे असे विविध व्यवसाय सुरू असतात. मात्र काही पालकांनी केवळ आर्थिक फायद्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्यांनाच अर्थार्जनाचे साधन बनवले.
या मुलांवर शारीरिक कष्ट तर लादले जात होतेच, पण शाळा, शिक्षण आणि बालपणापासूनही त्यांना वंचित ठेवले जात होते, हे प्रशासनाच्या निदर्शनास आले.


🔍 दोन तासांची मोहीम, मोठा परिणाम
या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत शिर्डी पोलीस ठाणे, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शोध मोहीम राबवण्यात आली.
या कारवाईदरम्यान शाळेत न जाता मंदिर परिसरात काम करणारी १० मुले व ४ अल्पवयीन मुली आढळून आल्या.


⚖️ पालकांवर गुन्हे, मुलांना संरक्षण
बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ (सुधारित २०११) मधील कलम २(१४) नुसार संरक्षणाची गरज असल्याने या १४ बालकांना ताब्यात घेण्यात आले.
त्याचबरोबर पालकांविरोधात बालन्याय अधिनियमान्वये शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. ८२/२२६) दाखल करण्यात आला आहे.
बालकल्याण समितीच्या आदेशानुसार या मुलांची श्रीरामपूर, संगमनेर व राहुरी येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.


🌼 साईमंदिर परिसरात दिलासा
या धडक कारवाईनंतर साईमंदिर परिसरात अनधिकृत विक्रेते व भिक्षेकर्‍यांचा शुकशुकाट दिसून येत असून, भाविकांनीही प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.


👮‍♂️ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे व शिर्डी पोलीस दलाने यशस्वीपणे पार पाडली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button