
शिर्डी ( प्रतिनिधी)
देशातील श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी तीन कोटीहून अधिक भाविक येत असतात. साईबाबांचा लाडू प्रसाद हा जगभरात सर्वश्रुत आहे. गर्दीच्या वेळी अनेक साई भक्तांना लाडू प्रसादासाठी तासंतास रांगा लावावे लागतात तर कधी लाडू प्रसाद मिळत नाही.

अशावेळी काही भक्तांना लाडू प्रसादविनाच माघारी जावे लागते. त्यामुळे जगाच्या नकाशावर नांवलौकिक प्राप्त केलेल्या श्री साईबाबा संस्थानने आता वेंडिंग मशीन अवगत करण्याची वेळ आली असून उज्जैन येथील महाकाल मंदिर व्यवस्थापनच्या धरतीवर शिर्डीत ठिकठिकाणी लाडू वेंडिंग (एटीएम)साई संस्थानने वेंडिंग मशीन बसवावे: साई भक्तांची मागणीमशीन बसवावे अशी मागणी साईभक्तांकडून करण्यात येत आहे. साईबाबा संस्थानच्या प्रमुख उत्सवात शिर्डीत लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात.
अनेकदा भाविकांना बाबांचा लाडू प्रसादासाठी संस्थान कर्मचाऱ्यांबरोबर संघर्ष करावा लागतो. साई संस्थान प्रशासनाने लाडू वेंडिंग मशीन बसविले तर लांब रांगा कमी होतील आणि यामुळे गर्दी व्यवस्थापन अधिक चांगले होईल. उज्जैन येथे महाकालेश्वर संस्थांनच्या माध्यमातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते अशाच प्रकारे लाडू वेडिंग एटीएम मशीनचा शुभारंभ करण्यात आला आहे. लाडू वाटपासाठी लागणारा मनुष्यबळाचा खर्च कमी होईल.
एकदा मशीन सेट केल्यावर सतत कामगार ठेवण्याची गरज
राहणार नाही. हिशोबात पारदर्शकता आणि विश्वासार्हता राहिल. मशीनद्वारे प्रत्येक व्यवहाराचा डिजिटल रेकॉर्ड होतो, त्यामुळे हिशोब अधिक पारदर्शक होतो. नफ्याचे आणि खर्चाचे अचूक व्यवस्थापन करणे सोपे होते. मशीनमध्ये ठेवलेला लाडूचा स्टॉक साठा नेहमी अपडेट होतो आणी कमी स्टॉकबद्दल अलर्ट मिळतो,
ज्यामुळे वेळेत साठा भरणे शक्य होते. भाविकांना पैसे टाकून किंवा डिजिटल पद्धतीने (UPI/ कार्ड) व्यवहार करून लाडू सहज मिळू शकतात. सुज्ञ आणि अशिक्षित अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी हे मशीन वापरण्यास सोपे आहे. वेंडिंग मशीनमुळे लाडू वितरण प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होतो.
यामुळे स्वच्छतेचे प्रमाण वाढते आणि भाविकांचा विश्वासही जास्त मिळतो. भाविकांना कमी वेळेत आणि कोणत्याही त्रासाशिवाय लाडू मिळतात. रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचतो. वेंडिंग मशीनमुळे लाडू वाटपासाठी विशिष्ट वेळेची गरज राहत नाही.
कोणत्याही वेळी भाविकांना लाडू सहज मिळू शकतात. एकंदरीत साईबाबा संस्थान प्रशासनाने साई भक्तांच्या दृष्टीने वरील सर्व बाबींचा विचार करता भाविकांना सुलभ सेवा मिळावी म्हणून शहरात ठिकठिकाणी लाडू वेंडिंग मशीन बसवून भाविकांना लाडू प्रसादासाठी होणाऱ्या नेहमीच्याच त्रासापासून सुटका करावी अशी मागणी करण्यात येत आहे.