
शिर्डी (प्रतिनिधी )कोपरगाव तालुक्यातील सर्व सेतु, महा ई सेवा केद्रं चालकाची मिटिंग शनिवार दिनाक 7/6 /2025 रोजी मान. तहसीलदार श्री सावंत साहेब याचे अध्यक्षेत पार पडली.

यावेळेस मार्गदर्शन करताना तहसीलदार सावंत साहेबानी तहसील स्तरावरील सर्व दाखले 24 तासात बनवण्याचे आदेश सर्व आधीका-याना दिले, तसेच मी असे पर्यन्त कोपरगाव तालुकयातील अर्जदाराना दाखल्या सर्दभात कुठलाही ञास होता कामा नये.
अशा स्पष्ट सुचना वजा आदेशच सर्व सेतु चालकानां दिला व लवकरच तालुक्यातील सर्व सेतु च्या कामकाजाची तपासणी करणार असल्याचे त्यांनी यावेळीजाहिर केले.
सेतु क्रेंदात अर्ज दाखल झाल्यावर त्याच दिवशी तो ऑनलाईन पोर्टलला अपलोड झालाच पाहीजे. असे निर्देश सर्व सेतु चालकांना नायब तहसीलदार सौ. सातपुते मॅडम यांनी दिले.
या प्रसंगी कोपरगाव सेतु संघटनेच्या वतीने मा. तहसीलदार सावंत साहेब ना. तहसीलदार सौ. सातपुते मॅडम व दाखले क्लार्क श्री माळवदे यानी रात्र राञ जागुन वेळेत दाखले बनवल्या बद्दल आभार व त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांचे आभार सेतु संघटनेचे जेष्ठ नेते श्री मुरादे यांनी मानले, शिंदे, कदम, काबंळे, चव्हाण, खंन्डीझोड, पुरकर, पानगव्हाणे, लामखडे व ईतर सर्व संघटनेचे सभासद, सेतु चालक यावेळी उपस्थित होते.