Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
राजकीय

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे आघाडीवर

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे पार पडत आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर आहेत. तर विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानी आणि महाविकास आघडीचे संदिप गुळवे हे तिसऱ्या क्रमांकावर

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात आहे. मात्र महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आघाडीवर आहेत. किशोर दराडे यांना 11 हजार 145 मते पडल्याची माहिती पुढे आली आहे. तर महाविकास आघाडीचे संदीप गुळवे यांना 7 हजार 88 मते तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना 9 हजारब370 मते पडली आहेत. त्यामुळे यांच्यात चुरशीची लढत होत असून या लढतीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किशोर दराडे हे सध्या आघाडीवर असले तयारी अंतिम निकाल येण्यास उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतमोजणी प्रक्रियेत जास्त मतपत्रिका आढळल्याने खळबळ
मतमोजणी प्रक्रियेत एकूण पाच मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली. तर चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळुन आल्या होत्या. यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर काही वेळाने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button