
ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स प्रकरणातील आरोपी भूपेंद्र सावळे यांच्याशी केलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी अहिल्यानगर एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

ग्रो मोअर इन्व्हेसमेन्ट फायन्सास कंपनी शिर्डी या कंपनीचे संचालक व इतरांनी चांगला परतावा देता असे अमीष दाखवुन व फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादीची एकुण ८ लाख रुपयांची फसवणुक करुन ते पसार झाल्याप्रकरणी भुपेंद्र राजाराम सावळे, वय २७ वर्षे, रा. नांदुखों रोड, साईभक्तो भुषण निवास, श्रीकृष्णनगर, शिर्डी ता. राहाता याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीसावळे व त्याचे दोन भाऊ तसेच मित्र नाशिक कडे फॉच्र्च्यूनर गाडीने जात असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व त्याच्या सोबतचे तीन पोलीस कर्मचारी यांनी लोणी जवळ अडवुन त्यांना म्हणाले, तुझ्या कडे कोणतेही आरबीआय चे लायसन्स नसतांना जनतेकडुन पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो.
मी त्याना माझ्यावर कोणती ही कार्यवाही करु नका मी कोणाची ही फसवणूक केलेली नाही, मला विनाकारण कोणत्याही खोटया गुन्हयात अडकवुन नका, त्यावर ते व त्यांचे सोबतचे कर्मचारी मला म्हणाले तुला जर यातुन सुटायचे असेल तर तु आंम्हाला १ कोटी ५० लाख रुपये नगद स्वरुपात दे.
त्यावर धाकराव व सोबतच्या कर्मचारी यांना नगद स्वरुपात पैसे नाहीत, नगद पैसे देवु शकत नाही सावळे म्हणाला. त्यांनतर धाकराव व सोबतच्या पोलीसांनी दोन भाऊ व मित्र यांना अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आवारातील पार्कीगमध्ये घेवून आले. तेथे थांबल्यावर धाकराव यांनी ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये दया असे सांगितले.
त्यावर विनाकारण एखादया खोटया गुन्हयात अडकण्यापेक्षा पोसई धाकराव सांगीतले प्रमाणे, त्यांनी दिलेल्या अकाउंटवर ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये ट्रान्सफर केले आहे अशी आरोपीने माहिती दिली असता, त्या बाबत सदर तपासादरम्यान चौकशी केली असता पोसई धाकराव व त्यांचे सोबतचे तीन पोलीस अंमलदार यांनी सदर गैरकृत्य केल्याचे सकृतदर्शनी दिसुन आले आहे.
सदर बाबत तपास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालावरुन आज दिनांक आज २१ जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव, व पोलीस अंमलदार मनोहर सिताराम गोसावी, पो.हे.कॉ बापुसाहेब रावसाहेब फोलाणे,पो.हे.कॉ गणेश प्रभाकर भिंगारदे सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना शासन सेवेतुन निलंबीत करण्यात आले असल्याचे एसपी घार्गे यांनी सांगितले.