Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
क्राईमशिर्डी

एलसीबीचा तत्कालीन लाचखोर  पोलीस संदीप चव्हाण हा निलंबित असतांना पुन्हा सक्रिय?

शिर्डी( प्रतिनिधी )अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभाग त्यासाठी सातत्याने कार्यरत असतो .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र याच विभागातील पोलीस कर्मचारी जर  अवैध धंदे व गुन्हेगारी नाहीसे करण्याऐवजी त्यांच्याकडून लाच घेऊन निलंबित होत असेल व पुन्हा निलंबित असतांना येऊन परत जैसे थे प्रकार करत असेल तर या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती कशी कमी होणार? असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी व अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

यावर नियंत्रण यावे म्हणून गुन्हा अन्वेषण विभाग, एलसीबी कार्यरत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच अवैध धंदे यावर नियंत्रण ठेवणे गुन्हेगारीचा शोध लावणे असे कामे प्रामुख्याने गुन्हा अन्वेषण विभाग करत असतो. या विभागाकडे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या आशेने पाहत असतात. मात्र याच विभागातील संदीप चव्हाण हा पोलीस कर्मचारी काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यामध्ये अडकला होता. त्यास निलंबितही केले होते.

मात्र परत हा संदीप चव्हाण तत्कालीन एलसीबीचा पोलीस कर्मचारी  त्याने शिर्डीत परत जैसे थे काम सुरू केले आहे. शिर्डीत हप्ते गोळा करण्याचे काम परत सुरु केले असल्याचे नागरिक बोलले जात  आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले तर त्यावर गुन्हा दाखल होतो सेवेतून निलंबित केले जाते.

चौकशी होते. तसाच प्रकार संदीप चव्हाण यांच्या बाबतीतही झाल्याचे बोलले जात आहे. मात्र अनेक कर्मचाऱ्यांप्रमाणे यांनेही या सर्व प्रकरणातून सही सलामत सुटण्यासाठी आटोकाठ प्रयत्न केले. विविध प्रकार अवलंबून पहिल्यासारखे चिरीमिरी गोळा करण्याचे काम सुरू झाले की काय अशी शंका आता नागरिकांमधून होत आहे व त्यासाठीच शिर्डीत तो आल्याचेही नागरिक चर्चा करताना दिसत होते.

जर एलसीबी हा विभाग संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक शिस्तबद्ध व कर्तव्यदक्ष विभाग समजला जातो मात्र या विभागातीलच एक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यात सापडतो. त्यावर कारवाई होते व परत हाच कर्मचारी जैसै  थे प्रकार करू लागतो . याला कोण जबाबदार? यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही हात आहे की काय? अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छापात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची संपत्तीची चौकशी होणे गरजेचे आहे.  कापडाचे दुकान टाकणे, इतर मालमत्ता खरेदी करणे. यासाठी मोठी रक्कम येते कोठून? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. व यामध्ये कोणी दोषीआढळला तर त्यावर परत कडक कारवाई करावी. अशी मागणी आता जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button