
शिर्डी (प्रतिनिधी) देशात ,राज्यात मोठमोठे आमिषे व गुंतवणुकीवर जादा व्याज (परताव्याचे गाजर)देण्याचे दाखवत एखाद्या ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट प्रा लिमिटेड कंपनीच्या नावाखाली सुरुवातीला विश्वास संपादन करत लाखो रुपये जमा केले जातात व नंतर कंपनी गुंडाळून जमा केलेले लाखो रुपये हडप केले जात असल्याचे अनेक उदाहरणे घडले असून अनेक अशा कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
शेवगाव ,कोल्हापूर नंतर साताऱ्यातही असाच गुंतवणूकदारांना सुमारे 59 लाखांना गंडा घालणाऱ्या एम एफ ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट प्रा लिमिटेड कं. वर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अशा काही इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड किंवा शेअर्स ट्रेडिंग नावाने प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे अमिषे दाखवून एक प्रकारे फसवणूक करत असल्याचे दिसून येत असून शिर्डीतही असाच प्रकार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
गुंतवणूकदारांनी शिर्डीतील ग्रोमोर ट्रेडिंग कंपनीत करोडो रुपये गुंतवल्याची चर्चा असून परतावा मिळणेही आता बंद झाले आहे.
अशी गुंतवणूकदारांमध्ये खाजगीत चर्चा होत असून शेवगाव कोल्हापूर सातारा आणि शिर्डीतही आता अशा कंपन्यांवर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
साताऱ्यामध्ये एम एफ ग्रुप लिमिटेड कं पाच जणांनी या इन्व्हेस्टमेंट कंपनीत ५० हजार रुपये गुंतवणूक केल्यानंतर महिन्याला २,७५० रुपयांचा हमखास परतावा देण्याचे आमिष दाखवून या कं. च्या पाच जणांनी मिळून गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा साताऱ्यात घातला. प्राथमिक तपासानुसार १५ जणांची ५९ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक उघडकीस आली. ही रक्कम वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
एम. एफ. ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट प्रा. लि.चे संचालक रिहाना अस्लम खान, अस्फान सिद्दिकी, अक्रम खान अस्लम खान, अक्रमचा सहायक वासीद खान अयुब खान यांच्या विरोधात रविवारी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे निरीक्षक संग्राम ताठे यांनी सांगितले.
गुंतवणूकदार रुखसाना महंमद आबेद (रा. सादातनगर) यांची नोकरी दरम्यान डॉ. अस्फानसोबत ओळख झाली होती. त्यांनी सदर कंपनीविषयी माहिती देऊन, ते स्वतः कंपनीचे भागीदार असल्याचे सांगितले. त्यानंतर विश्वास संपादन करून गुंतवणूक केल्याचे सांगत या कंपनीत आई आणि मुलगा असे १५ लोक फसवले गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यांच्याकडून ५९लाख ४२ हजार रुपये लुटण्यात आले.या कं.त गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल,
असे आमिष त्यांनी रुखसाना यांना दाखवले गेले. नोव्हेंबर २०२३ मध्ये रुख्साना यांनी प्रथम ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर कंपनीच्या लेटरहेडवर २,७५० रुपयांचा परतावा देण्याचा करार करण्यात आला. सुरुवातीला काही दिवस रुखसाना यांना
एप्रिल २०२४ पर्यंत परतावा मिळाला.एप्रिल २०२४ पर्यंत रुखसाना यांच्यासह अन्य काही गुंतवणूकदारांना नियमित परतावा मिळाला. अनेकांनी मुदत संपल्यानंतर मूळ रक्कम परत देण्याची मागणी केली.
तेव्हा डॉ. अस्फानने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. कंपनीचा मूळ मालक अक्रम खान पसार झाला. त्याने मोबाइलही बंद केले.
तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रुखसाना यांच्यासह १५ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक शैलेश देशमुख तपास करत आहेत.
शिर्डीतही अशाच एक शेअर्स ट्रेडिंग कंपनीच्या नावाने अनेक गुंतवणूकदारांकडून जादा परतावा दिला जाईल असे आमिषे दाखवून करोडो रुपये गोळा केले आहेत. मात्र सुरुवातीला परतावा काहीना देण्यातही आला. मात्र आता परतावा देण्यास व मुद्दल देण्यास टाळाटाळ होत असल्याची गुंतवणूकदारांमध्ये शिर्डीत चर्चा आहे.
त्यामुळे ही कंपनी ही शेवगाव कोल्हापूर सातारा प्रमाणेच फसवी निघते की काय? अशी शंका गुंतवणूकदारांमध्ये आहे. तसे वाटल्यास शिर्डीमध्येही फसवणूक झालेल्या पीडित गुंतवणूकदारांनी गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. असे आता नागरिकांमधून आपसात बोलले जात आहे.