Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
अ.नगरशिर्डी

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा!

शिर्डी (प्रतिनिधी) दरवर्षी १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन जगभर साजरा केला जातो. हा दिवस आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त वैद्यकीय सेवेस समर्पित परिचारक/परिचारिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या निमित्ताने श्री साईबाबा संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांत जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकीय सेवेप्रती निष्ठा दर्शविणाऱ्या शपथविधीने झाली. यानंतर भारत-पाकिस्तान सीमारेषेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


या कार्यक्रमात रुग्णालयात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या १२ परिचारक/परिचारिकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्‍ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून सन्‍मान करण्‍यात आला. त्यामध्ये सविता जाधव, सुचिता मुठाळ, सुवर्णा व्हनमाने, मिनाश्री ओहोळ, सविता बनसोडे, मनिषा सदाफळ, स्वाती मंतोडे, असिमखान पठाण, दीपाली वर्पे, इरफान खान पठाण, नैना चौधरी आणि सोनल साबळे यांचा समावेश होता.


मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सन्मानित परिचारक/परिचारिकांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य कर्मचाऱ्यांनीही समर्पित भावनेने कार्य करून संस्थान रुग्णालयाची सेवा आणि नावलौकिक वृद्धिंगत करावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे,

सहा. अधिसेविका मंदा थोरात, प्र. अधिसेविका नजमा सैय्यद, रुग्णालय जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांच्यासह दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टर्स व परिचारक/परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदा थोरात यांनी तर सूत्रसंचालन सुरेश टोलमारे यांनी केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button