
राहाता शहरात कायद्याचा धाक संपला आहे का?
हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात धुमसत आहे. कारण शहराच्या छत्रपती संकुल परिसरात, नगर–मनमाड रोडवर आणि बाजारतळ भागात बिंगो आणि मटका सारखे अवैध धंदे उघड्यावर सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
दिवसाढवळ्या, नागरिकांच्या गर्दीत आणि पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच जुगाराचे अड्डे बिनधास्त सुरू आहेत.
महिलांची, विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या भागात मटका टपऱ्या आणि बिंगो केंद्रे निर्भयपणे सुरू आहेत —
आणि पोलीस प्रशासन मात्र शांत!
👁️🗨️ “पोलिसांची डोळेझाक की मौन संमती?”
छत्रपती संकुलातील काही गाळ्यांमध्ये आणि मोकळ्या जागेत हे धंदे सुरू असल्याचे नागरिकांनी स्पष्ट सांगितले आहे.
यामागे स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांचे संरक्षण आणि राजकीय पाठबळ असल्याची चर्चा शहरभर आहे.
“कायद्याचे रक्षकच जर मौन धारण करत असतील,
तर गुन्हेगारांना कोण थांबवणार?”
असा सवाल नागरिक सर्रास विचारताना दिसत आहेत.
⚠️ महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
रात्रीच्या वेळी या ठिकाणी संशयास्पद हालचाली, पैशांचा उघड खेळ आणि मद्यधुंद तरुणांची गर्दी यामुळे परिसरात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलांनाही आता या भागातून जाणे टाळावे लागते.
नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कारवाई अद्याप शून्यच!
🕵️♂️ पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच अवैध धंदे!
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे — हे सर्व राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मतदारसंघातच खुलेआम सुरू आहे.
“पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायद्याचा असा बेभान खेळ?”
असा दाबक्या आवाजात प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
“वरच्या पातळीवर कुणाचं संरक्षण मिळतंय का?”
असे बोलणे आता कानावर येत आहे.
🚔 कारवाईची मागणी — नागरिकांचा संताप
राहाता शहरात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे साम्राज्य,
हा प्रश्न आता प्रत्येक नागरिक विचारतोय.
शहरात चालणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यांवर तात्काळ गंडांतर आणण्यासाठी
नूतन आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे
आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघाचौरे
यांनी स्वतः लक्ष घालून धाडसी कारवाई करावी,
अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.
“जर प्रशासनाने आता तरी कारवाई केली नाही,
तर जनतेचा विश्वास पोलीसांवरून उडेल,
आणि नागरिक रस्त्यावर उतरतील,”
असा इशाराही समाजप्रेमी नागरिक देत आहेत.