Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरक्राईम

इथे जमीन घ्यायची नाही” म्हणत गावठी कट्ट्याने धमकी शिर्डीचा जमीन खरेदीदार निशाण्यावर मारहाण → अपहरण → खून?

नायगाव (ता. श्रीरामपूर) येथे जमीन खरेदीच्या व्यवहाराच्या नावाखाली रचण्यात आलेल्या रक्तरंजित कटकारस्थानाचा शेवट थेट खुनात झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
मारहाणीनंतर बेपत्ता झालेल्या निलेश एकनाथ शेंडगे (रा. नेवासा) यांचा मृतदेह आज पाण्यात आढळून आल्याने, हा प्रकार अपघात नसून पूर्वनियोजित खूनच असल्याचा गंभीर आरोप नातेवाईक व फिर्यादी करत आहेत.
ही घटना केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची नाही, तर जमीन माफियांची वाढती दहशत, सशस्त्र गुंडगिरी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या उघड अपयशाचा काळा चेहरा उघडा पाडणारी आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


जमीन पाहण्यास गेले… आणि मृत्यूच्या जाळ्यात अडकले


फिर्यादी चेतन पेत्रस खाजेकर (वय 23, व्यवसाय – डीजे ऑपरेटर, रा. श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,
दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी नायगाव येथे जमीन व्यवहारासाठी ते, त्यांचे मामा निलेश शेंडगे, तसेच शिर्डी येथील जमीन खरेदीदार निलेश जाधव व अमित कुटे गेले होते.
ही जमीन शिर्डी येथील व्यक्तीस विक्रीसाठी असल्यानेच काही जणांचा राग पेटला होता, असे फिर्यादीत नमूद आहे.
“इथे जमीन घ्यायची नाही” म्हणत सशस्त्र हल्ला
नायगाव येथे पोहोचताच काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ व इरटिगा गाड्यांमधून आलेल्या सशस्त्र टोळीने थेट हल्ला चढवला.


फिर्यादीनुसार —
अर्जुन दाभाडे याने गावठी कट्ट्यासदृश हत्यार रोखून जीवे मारण्याची धमकी दिली
सागर भोसले, राहुल धुमाळ यांनी लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली
मेजर राणा याने फिर्यादी चेतन खाजेकर यांच्या उजव्या डोळ्याजवळ मारून ७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावली
विजु पवार, अकिल बिल्डर, मयुर शिर्के, राहुल चव्हाण, आसिफ कैची यांच्यासह इतरांनी लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण केली
हा हल्ला इतका भीषण होता की, सर्वजण जीव वाचवण्यासाठी पळून गेले.


पळताना एक जण मागे राहिला… आणि तोच कायमचा गायब झाला
हल्ल्यानंतर सर्वजण पळून गेले असताना निलेश शेंडगे मात्र घटनास्थळीच मागे राहिले.
त्यानंतर ते कोणालाही दिसले नाहीत.
सुरुवातीला “तो मिळून येईल” असे सांगून प्रकरण थंडावण्याचा प्रयत्न झाला.
मात्र आज निलेश शेंडगे यांचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याने,
संपूर्ण कट उघड झाला आहे.


➡️ मारहाण
➡️ अपहरण
➡️ पुरावे नष्ट करण्यासाठी पाण्यात फेकून देणे
हा प्रकार थेट खुनाकडे निर्देश करणारा असल्याचा ठाम आरोप केला जात आहे.
शिर्डीचा जमीन खरेदीदार लक्ष्य का?
बाहेरच्यांना नायगावमध्ये नो एन्ट्री?
या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे,
जमीन खरेदी करणारे निलेश जाधव व अमित कुटे हे शिर्डीचे रहिवासी आहेत.

यामुळे प्रश्न उपस्थित होतो — ❓ शिर्डी–श्रीरामपूर बाहेरच्यांनी जमीन घेतली तर मारहाण केली जाते का?
❓ नायगाव परिसरात जमीन माफियांची ‘हुकूमशाही’ सुरू आहे का?
पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप
गुंड खुलेआम, मृतदेह पाण्यात – कायदा कुठे होता?
इतक्या मोठ्या प्रमाणात —
सशस्त्र गुंडांचा जमाव
जीवघेणा हल्ला
एक व्यक्ती बेपत्ता
आणि अखेर मृतदेह सापडतो
तरीही वेळेत ठोस कारवाई का झाली नाही?


हा प्रश्न आता थेट पोलीस प्रशासनाच्या दारात उभा राहिला आहे.
संतप्त मागण्या
👉 खुनाचा गुन्हा दाखल करा
👉 सर्व आरोपींना तात्काळ अटक करा
👉 जमीन माफियांचे जाळे उघडा
👉 दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्या

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button