Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
राजकीयशिर्डी

उपनगराध्यक्ष पदावर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती  ढाण्या वाघ सतीश गोंदकर की मित्र पक्षातील शिवसेना राष्ट्रवादी की अजून एखादा सरप्राईज चेहरा?

शिर्डी | साईबाबांच्या भूमितील एकमेव निर्भीड दैनिक “साईदर्शन न्यूज एक्स्क्लुझिव्ह”

sai nirman
जाहिरात

शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागला…महायुतीच्या विजयाचा गुलाल उडाला…
फटाक्यांचा आवाज थांबला…

पण खरी राजकीय धडधड आता सुरू झाली आहे —
“शिर्डीचा उपनगराध्यक्ष कोण?”
महायुतीचा दणदणीत विजय, पण पदासाठी रस्सीखेच
ना. राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने नगराध्यक्ष पदासह तब्बल २० जागांवर एकहाती विजय मिळवला.
भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि अपक्षांचा मजबूत फोर्ट तयार झाला आहे.

DN SPORTS

बलाबल पाहता –
भाजपा : १४ नगरसेवक
शिवसेना : आशाताई कोते, बापू ठाकरे, सुनिता गोंदकर
राष्ट्रवादी : निलेश कोते, दीपक गोंदकर, अलका गोतिस
विखे समर्थक ३ अपक्ष नगरसेवक
उपनगराध्यक्ष पदाचा खरा खेळ आता सुरू
भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्याने
उपनगराध्यक्ष पदावर पहिली दावेदारी भाजपाची असणार हे स्पष्ट आहे.
मात्र मित्रपक्ष गप्प बसतील का?
नाही!
शिवसेना व राष्ट्रवादीकडून
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या माध्यमातून जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता आहे.
मागचा इतिहास पुन्हा घडणार का?
मागील टर्ममध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले सुजित गोंदकर विखे गटात सहभागी झाले
आणि थेट उपनगराध्यक्ष बनले!
आता तोच पॅटर्न पुन्हा?
ढाण्या वाघ सतीश (नंदू) गोंदकर – चर्चेत अव्वल!
प्रभाग क्रमांक २ मधून अपक्ष म्हणून निवडून आलेले
नंदू उर्फ सतीश गोंदकर
जर विखे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झाले,
तर उपनगराध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.
शहरातील राजकीय वर्तुळात
“यावेळी अपक्षाला संधी देऊन पुन्हा मास्टरस्ट्रोक!”
अशी कुजबुज सुरू आहे.
 उपनगराध्यक्ष पदासाठी तगडी दावेदारी आहे.
शेवटचा शब्द एकाच व्यक्तीचा!
सर्व गणितं, लॉबिंग, फिल्डींग बाजूला ठेवलं
तर शेवटी निर्णय एकच —
ना. राधाकृष्ण विखे पाटील
जो चेहरा ते निवडतील
त्याच्याच गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडणार!
शिर्डीकरांची उत्सुक नजर…
ढाण्या वाघ सतीश गोंदकर?
की मित्रपक्षातील शिवसेना, राष्ट्रवादी?
की एखादा डार्क हॉर्स?
काऊंटडाऊन सुरू आहे…
शिर्डीच्या राजकारणातील पुढचा सस्पेन्स लवकरच उलगडणार!
“सबका साथ, सबका विकास” – फक्त घोषवाक्य नाही, शिर्डीत प्रत्यक्ष अंमलबजावणी?
भाजपाचे ब्रीदवाक्य “सबका साथ, सबका विकास” हे यावेळी शिर्डीच्या राजकारणात केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवले जात असल्याची चर्चा आहे.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडणुकीत केवळ मित्रपक्षच नव्हे, तर विरोधक आणि अपक्षांनाही सन्मानपूर्वक वागणूक देत सर्वसमावेशक भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले.
विरोधक-अपक्षांनाही मान, हीच विखेंची स्ट्रॅटेजी
विखे पाटलांची ओळख ही नेहमीच समतोल, समन्वय साधणारी आणि सर्वांना सोबत घेणारी राहिली आहे.
याच भूमिकेमुळे यावेळी निवडणुकीनंतर
अपक्ष नगरसेवक सत्तेत सहभागी होण्यास सकारात्मक
मित्रपक्षांमध्येही विश्वासाचं वातावरण
आणि नगरपरिषदेत स्थिर सत्ता
असा मजबूत फॉर्म्युला तयार होत असल्याचे जाणकार सांगतात.
“जो निवडून येईल तो आमचा” – सुजय विखे पाटील यांचा स्पष्ट संदेश
निवडणूक प्रचारादरम्यान
मा. खासदार सुजय विखे पाटील यांनी जाहीर सभेत केलेले वक्तव्य आज विशेष अर्थपूर्ण ठरत आहे.
“जो निवडून येईल तो आमचाच आहे. शिर्डीचा विकास हा व्यक्तीपेक्षा मोठा आहे.”
या एका वाक्यातूनच
पक्षीय भेदाभेद टाळण्याचा संकेत
अपक्ष व मित्रपक्षांसाठी खुले दरवाजे
आणि उपनगराध्यक्ष पदासाठी फ्लेक्सिबल निर्णय
हे स्पष्ट झाले आहे.
उपनगराध्यक्ष निवडीत ‘समावेशक निर्णय’ होणार?
याच पार्श्वभूमीवर
उपनगराध्यक्ष पदाची निवड
केवळ संख्याबळावर नाही
तर समन्वय, विश्वास आणि विकासाच्या दृष्टीने केली जाणार असल्याची चर्चा आहे.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयाकडे
आणि त्या निर्णयातून उपनगराध्यक्ष पदाचा ताज कुणाच्या डोक्यावर बसेल
याकडे लागल्या आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button