Letest News
पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा...
अ.नगरक्राईम

“१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात सुरू असलेल्या गर्भलिंग निदानाच्या भीषण रॅकेटचा पोलिसांनी मोठा भांडाफोड केला आहे. “मुलगा की मुलगी?” या एका प्रश्नासाठी १०,००० रुपये उकळणाऱ्या या टोळीने थेट कायद्यालाच आव्हान दिल्याचे उघड झाले आहे.
दि. २९ एप्रिल २०२६ रोजी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, निळवंडे कॅनॉल शेजारील एका घरात हा काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले. लगेचच पोलिसांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह सापळा रचत बनावट गरोदर महिलेला ग्राहक म्हणून पाठवले… आणि पुढे जे उघड झाले ते धक्कादायक होते!

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


👉 “१० हजार द्या, मुलगा-मुलगी सांगेन!” — डॉक्टरांचा उघड सौदा
छापा टाकला असता, दोन खोल्यांच्या घरात थेट पोर्टेबल सोनोग्राफी मशीन लावून गर्भलिंग तपासणी सुरू असल्याचे आढळले. आरोपी डॉ. राहुल भनगे आणि त्याचा साथीदार अभिजीत भुसाळ हे महिलांकडून प्रत्येकी १०,००० रुपये घेऊन गर्भातील बाळाचे लिंग सांगत असल्याची कबुली दिली.
👉 एजंटमार्फत ग्राहकांची “डिलिव्हरी”
या रॅकेटमध्ये अभिजीत भुसाळ हा एजंट म्हणून काम करत होता. तोच बीड, नाशिक, पुणे, संगमनेर, नांदगाव अशा विविध ठिकाणांहून गरोदर महिलांना येथे आणत होता. म्हणजेच हा प्रकार केवळ स्थानिक नव्हे तर मोठ्या जाळ्याचा भाग असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.


👉 छाप्यात ८ गरोदर महिला सापडल्या — सगळ्याच ३-४ महिन्यांच्या!
छाप्यावेळी ८ गरोदर महिला प्रत्यक्ष तपासणीसाठी उपस्थित होत्या. त्यांच्या वैद्यकीय तपासणीत त्या सर्व गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. या महिलांसोबत आलेल्या नातेवाईकांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
👉 २४ लाखांचा मुद्देमाल जप्त — कार, मशीन, रोख रक्कम सगळं जप्त!
या कारवाईत पोलिसांनी तब्बल २४,०९,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये
४.५ लाखांचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन
५९,००० रुपये रोख
४ मोबाईल फोन
३ कार (स्विफ्ट, इटिंगा, वॅगनर)
वैद्यकीय साहित्य


👉 कायद्याचा उघड उल्लंघन — थेट गुन्हा दाखल
गर्भलिंग निदानावर बंदी असतानाही, कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आणि योग्य पात्रता नसताना हा व्यवसाय सुरू होता. याप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्ट आणि PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👉 ९ आरोपी अटकेत — मोठ्या रॅकेटकडे तपासाची दिशा
या प्रकरणात डॉक्टर आणि एजंटसह एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत.


🔥 संतापजनक वास्तव:
“मुलगा हवा” या विकृत मानसिकतेमुळे अजूनही गर्भातील मुलींचा जीव धोक्यात घालणारे असे रॅकेट्स फोफावत आहेत. पैशासाठी मानवतेचा गळा घोटणाऱ्यांविरुद्ध आता कठोर कारवाईची गरज अधिक तीव्र झाली आहे.


कारवाई करणारे पथक (नावे):
या धाडसी कारवाईत सहभागी झालेले अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे —
👉 मार्गदर्शनाखाली :
मा. श्री. सोमनाथ घार्गे — पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
मा. श्री. सोमनाथ वाघचौरे — अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर
मा. श्री. जयदत्त भवर — उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर
👉 मुख्य कारवाई पथक :
स.पो.नि. युवराज आठरे
पो.स.ई. आशिष चौधरी
म.पो.स.ई. कोमल कुमावत
म.पो.स.ई. बेबी आण्णा शिंदे
👉 पथकातील कर्मचारी :
पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे
पो.हे.कॉ. संदिप दरंदले
पो.हे.कॉ. सचिन धनाड
पो.हे.कॉ. असिर सय्यद
पो.हे.कॉ. साईनाथ राशिनकर
पो.ना. सचिन शेवाळे
पो.कॉ. अशोक गाडे
पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे
पो.कॉ. भोईटे
म.पो.कॉ. मनिषा गिरी
👉 इतर सहकार्य :
डॉ. स्वाती पवार — वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय लोणी
डॉ. गोकुळ घोगरे — तालुका समुचित प्राधिकारी (PCPNDT)
छायाचित्रकार — प्रमोद पवार
ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली असून, संपूर्ण पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button