Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
राजकीयशिर्डी

ना.विखेंकडून हिरवा झेंडा? सतीश गोंदकर उपनगराध्यक्ष होणार का? शिर्डी नगर परिषदेतील सत्तासमीकरणे हालचालीत

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या वर्नीसाठी सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक नगरसेवकांनी तसेच विविध राजकीय नेत्यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीगाठी वाढवल्याचे कळते. त्यामुळे या वर्नीमध्ये ना. विखेंची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उपनगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये सतीश गोंदकर यांचे नाव प्रामुख्याने पुढे येत असल्याचे समजते. नगर परिषदेतील अनुभव, संघटनात्मक बांधिलकी, तसेच पक्षासाठी केलेले सातत्यपूर्ण काम या मुद्द्यांमुळे गोंदकर यांना संधी दिली जावी, असे मत अनेक नगरसेवक उघडपणे व्यक्त करत असल्याची चर्चा आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या नगर परिषदेतील बहुसंख्य नगरसेवकांचे मत सतीश गोंदकर यांच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाची वर्नी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याबाबत शहरात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.


महत्त्वाचे म्हणजे ही चर्चा फक्त सत्ताधारी गोटापुरती मर्यादित नसून, शिर्डीतील सामान्य नागरिकांमध्येही “यावेळी गोंदकरांना संधी मिळावी” अशी भावना प्रबळ होताना दिसत आहे. विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग, नागरिकांच्या प्रश्नांवर थेट भूमिका आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क, यामुळे गोंदकर यांना नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे समजते.
दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या इतर काही नगरसेवकांची नावेही चर्चेत असली, तरी राजकीय वजन आणि संख्याबळाच्या दृष्टीने सतीश गोंदकर आघाडीवर असल्याची कुजबुज आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


आता सर्वांचे लक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील कोणाला हिरवा कंदील देतात, तसेच पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे लागले आहे. या निर्णयामुळे शिर्डी नगर परिषदेतील आगामी सत्तासमीकरणे ठरणार असून, शहराच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button