Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
राजकीयशिर्डी

संस्थान मधील 598 कर्मचारी व आउटसोर्सिंग कर्मचारी कायम करण्याचे शासनाचे निर्णयकर्मचारिंमध्ये उत्साहाचे वातावरण

संस्थान मधील 598 कर्मचारी व आउटसोर्सिंग कर्मचारी कायम करण्याचे शासनाचे निर्णय कर्मचारिंमध्ये उत्साहाचे वातावरण

आज दि.१० सप्‍टेंबर २०२४ रोजी गेट नं.०३ जवळील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपात संस्‍थान आस्‍थापनेवरील ५९८ कंत्राटी कर्मचा-यांना संस्‍थान सेवेत सामावून घेणेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते प्रातनिधीक स्‍वरुपात १६ कर्मचा-यांना नेमणूक आदेश देण्‍यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, सर्व प्रशासकिय अधिकारी, विविध विभागांचे विभागप्रमुख व कर्मचारी तसेच शासकिय अधिकारी, शिर्डी ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

kamlakar


यावेळी मान्‍यवरांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करत महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्‍यमंत्र देवेंद्र फडणवीस व उपमुख्‍यमंत्री अजित पवार तसेच श्री साईबाबा संस्‍थानच्‍या मा.तदर्थ समितीचे अध्‍यक्ष सुधाकर यार्लगड्डा व मा.तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिाकारी सिध्‍दाराम सालीमठ यांचे मिळालेल्‍या सहकार्याबद्दल आभार व्‍यक्‍त केले.\


मा.उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्‍थान मध्‍ये सलग १० वर्ष कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचा-यांना संस्‍थान सेवेत कायम करणे, On Time Scheme राबविणेकामी संस्‍थान तदर्थ समितीचे मान्‍यतेने शासनाकडे प्रस्‍ताव पाठविण्‍यात आलेला होता.

त्‍यास शासनाने दि.०५/०९/२०२४ रोजी मान्‍यता दिलेली असून तदर्थ समितीचे दि.०९/०९/२०२४ चे सभेतील निर्णयानुसार संस्‍थानमध्‍ये सलग १० वर्ष सेवा झालेल्‍या २७२६ कंत्राटी कर्मचा-यांना संस्‍थान मध्‍ये सामावून घेणेकामी आवश्यक कार्यवाही करण्‍यात येत आहे.


संस्‍थान अधिनियम २००४ अंमलात येण्‍यापुर्वी कार्यरत ५३० कंत्राटी कर्मचा-यांपैकी ३९६ पात्र कर्मचा-यांना शै‍क्षणिक अर्हता व आकृतीबंधातील रिक्‍त पदांनुसार ५९ कर्मचा-यांना गट क व ३३७ कर्मचा-यांना गट ड चे सरळ सेवेच्‍या पदांवर दि.१०/०९/२०२४ पासून संस्थान आस्थापनेवर सामावून घेण्यात येत आहे. रिक्‍त पदांअभावी शिल्‍लक राहीलेल्‍या ९४ कर्मचा-यांना टप्‍या-टप्‍याने रिक्‍त होणा-या पदांवर सामावून घेण्‍यात येणार आहे.


तसेच संस्‍थान अधिनियम २००४ अंमलात येण्‍यापुर्वीचे शैक्षणिक अर्हता व रिक्‍त पदांअभावी शिल्‍लक कर्मचारी तसेच अधिनियम २००४ अंमलात आल्‍यानंतरचे उर्वरीत कंत्राटी कर्मचा-यांपैकी गट क व गट ड चे पदावर कार्यरत शैक्षणिक अर्हता प्राप्‍त कर्मचा-यांची स्‍पर्धात्‍मक परिक्षा घेऊन, त्‍यातील गुणानुक्रमानुसार रिक्‍त स्‍थायी पदांवर सामवून घेण्‍याची प्रक्रिया करण्यात येईल.

याप्रमाणे समायोजन झाल्‍यानंतर उर्वरीत कंत्राटी कर्मचा-यांना संस्‍थानचे मंजुर आकृतीबंधातील कायम कंत्राटी पदांवर सामावून किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन तसेच समितीचे मान्‍यतेने प्रोत्‍साहन भत्‍ता, शॉप अॅक्‍ट नुसार रजा/सुटया व सध्‍या देण्‍यात येत असलेल्‍या इतर सवलती देण्‍यात येतील.

याबरोबरच सध्‍या कार्यरत स्‍थायी गट ड पदांवरील कर्मचा-यांना मा.शासनाचे मान्‍यतेने तदर्थ पदोन्‍नती देऊन, त्‍यांची सेवाजेष्‍ठता संरक्षित करण्‍यात येणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button