Letest News
शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा... गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी CITYMARKET सज्जगणेशमूर्तीपासून सजावटीच्या साहित्यापर्यंत सर्व वस्तू एकाच छत... १४ वर्षांचा भगंदराचा त्रास… ५-६ शस्त्रक्रियांनीही आराम नाही राहात्यात उपचारानंतर पुन्हा मिळाला वैद्य... कोट्यवधींची ‘साई ज्योत’ अर्धवटच! संचालक विठ्ठल पवार यांच्या पाठपुराव्याने प्रकरण ऐरणीवर
राजकीयशिर्डी

साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडेंनी दिला प्रामाणिकतेचा आदर्श!

साई मंदिरात सापडली सोन्याची अंगठी; सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकता
शिर्डी : श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात कर्तव्य बजावत असताना श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागातील सुरक्षा कर्मचारी श्री. लक्ष्मण घोरपडे यांना सोन्याची अंगठी आढळून आली. विशेष म्हणजे, सदर अंगठी स्वतःकडे न ठेवता त्यांनी ती तत्काळ प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केली.
सापडलेल्या सोन्याच्या अंगठीचे वजन ३.२०० ग्रॅम असून तिची अंदाजे किंमत ४८ हजार रुपये आहे. सध्या सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही घोरपडे यांनी दाखविलेली प्रामाणिकता आणि कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद ठरली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


साई मंदिरात सेवा, प्रामाणिकतेची परंपरा कायम!
श्री साईबाबांच्या पावन समाधी मंदिरात देश-विदेशातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अशा परिस्थितीत भाविकाची मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर ती तातडीने संस्थानच्या कार्यालयात जमा करण्याची कृती ही संस्थानच्या कर्मचाऱ्यांमधील प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावाचे उत्तम उदाहरण असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, सुरक्षा कर्मचारी लक्ष्मण घोरपडे यांच्या या उल्लेखनीय प्रामाणिकतेबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भीमराज दराडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या प्रामाणिक कार्याचे कौतुक केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button