Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
शिर्डी

श्री साईनाथ रुग्‍णालय शिर्डी येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न…

आज रविवार दि.१२/०५/२०२४ श्री साईनाथ रुग्‍णालय, शिर्डी येथे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डी, शंभुराजे प्रतिष्‍ठान शिर्डी शहर व गिरीष ऑप्‍टीक्‍स, मुंबई यांच्‍या संयुक्‍त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर सकाळी १० ते सांयकाळी ०५ वा. या वेळेत पार पडले शिबिराचे उद्घाटन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, यांच्या हस्ते करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

याप्रसंगी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, वैद्यकीय संचालक, डॉ.प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षीका, डॉ.मैथिली पितांबरे, गिरीष ऑप्‍टीक्‍स, मुंबई यांचे प्रकाश गंगवाणी साईनाथ रुग्णालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ. अजित पाटील, डॉ. अनघा विखे, आधीसेविका मंदा थोरात, नजमा सय्यद संस्थानचे प्र. कामगार अधिकारी श्री रवींद्र नवले तसेच रुग्णालयातील सर्व परिचारिका व कर्मचारी यांच्यासह शंभुराजे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

kamlakar


याप्रसंगी बोलतांना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी म्‍हणाले की, अशाच प्रकारच्‍या शिबिरांचं आयोजन यापुढील काळात नियमित साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात येईल. जास्तीत जास्त रुग्णांना संस्थानच्या दोन्ही रुग्णालयाच्या माध्यमातून उत्कृष्ट रुग्ण सेवा देण्याचा प्रयत्न संस्थानच्या दोन्ही हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारी यांनी करावा असे आव्हान या प्रसंगी केले. व सर्व परिचारीका यांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त शुभेच्‍छा दिल्‍या.


या शिबीरात गिरीष ऑप्‍टीक्‍स मुंबई व श्री साईनाथ रुग्‍णालय येथील नेत्ररोग तज्ञ यांनी ९०० रुग्‍णांची तपासणी करुन त्‍यांचे निदान केले व गरजु ४५० रुग्‍णांना मोफत चष्‍मे वाटप केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button