Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
क्राईमशिर्डी

श्रीरामपूरचे माजी आमदार लहू नाथा कानडे यांचे पाकीट शिर्डीतून भामट्याने मारले!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवानिमित्त आयोजित नाशिक विभागाच्या मंगल कलश रथ यात्रेच्या शिर्डी येथील मिरवणुकीत श्रीरामपूरचे माजी आमदार यांचे पाकीट चोरी गेले. अशा मोठ्या नेत्यांची पाकीटे चोरी जातात तर सर्वसामान्य साई भक्तांचे काय?

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असा सवाल आता साईभक्त व ग्रामस्थांकडून होत आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की. गेल्या काही दिवसापूर्वी शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवानिमित्त आयोजित नाशिक विभागाच्या मंगल कलश रात्रीची मिरवणूक होती. या मिरवणुकीत श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडे यांचा खिसा मारला गेला.

या संदर्भात त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, मी राष्ट्ववादी क्रॉंगेस पार्टीच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव निमित्त आयोजित नाशिक विभागाच्या मंगल कलश रथ यात्रेच्या स्वागतासाठी पक्षाचा वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणुन त्यादिवशी शिर्डी येथे आलो होतो. रशयात्रेची मिरवणुक चालु होती.

मिरवणुकीमध्ये हजार पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. माझे डोक्यावर मंगल कलश असल्याने मी दोन्ही हाताने मंगल कलश धरलेला होता‌ कार्यकर्त्याच्या आग्रहावरुन गर्दीमध्ये सहभागी झालो होतो‌. त्यावेळेस माझ्या नेहरु शर्टच्या उजव्या खिशामध्ये असलेले पैशाचे पाकिट चोरटयाने चोरले आहेत .

पाकिटाचा रंग निळसर असुन पाकिटामध्ये 12000रु त्यात (500रु दराच्या च्या चोवीस किंमतीच्या भारतीय चलनी नोटा) इनक्मटॅक्सचे पॅनकार्ड, आधारकार्ड, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडीट कार्ड, (श्रीरामपुर शाखा), स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडीट कार्ड, (सावेडी शाखा अहिल्यानगर), बँक ऑफ बडोदयाचे क्रेडीट कार्ड (श्रीरामपुर शाखा), बँक ऑफ महाराष्ट्र चे क्रेडीट कार्ड (श्रीरामपुर शाखा), असे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले आहे.

अशी फिर्याद त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 431 /2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 303 ( दोन) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत. दरम्यान माजी आमदारचे पाकीट शिर्डीतून चोरी जाते तर सर्वसामान्य साई भक्तांची काय परिस्थिती शिर्डीत असेल याचा अंदाज येतो.

शिर्डीत गर्दीचा फायदा घेऊन अनेक साई भक्तांची पाकीटे मारले जातात पाकीटमार्‍यांच्या टोळ्या येथे कार्यरत आहेत .मात्र त्यांचा बंदोबस्त अजूनही होत नाही. त्यामुळे साईभक्त ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button