
श्रीरामपूर : भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडूकुमार शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेला मारहाण करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री शहरातील विद्या हौसिंग सोसायटीजवळ ही घटना घडली.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात बंडूकुमार शिंदेसह यशराज शिंदे, ऋतुराज शिंदे आणि सनी वडांगळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या एका महिलेच्या घरी जाऊन आरोपींनी हा प्रकार केला. आयुष ढवळे यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात ढवळे यांना मारण्यासाठी हे चौघे त्यांच्या घरी गेले होते. आयुष घरी नसल्याचे महिलेने सांगितले असतानाही, आरोपींनी बळजबरीने घरात प्रवेश केला. त्यांनी महिलेला मारहाण, शिवीगाळ करत तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादीमध्ये पीडित महिलेने केला आहे.
४ दिवसांत पूर्वी एका अल्पवयीन मुलीच्या विनायभंग केल्या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सह आरोपी असलेल्या बंडू उर्फ बंडूकुमार शिंदे, हा वारंवार पक्षाच्या आणि पदाच्या ताकदीचा गैरवापर करून, दादागिरी करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
यात धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीच्या विनय भंग प्रकरणाचा तपास ज्या पोलीस अधिका-याकडे आहेत,त्यांच्या सोबत शिंदे याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तर महिलेस मारहाण करून विवस्त्र केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास ज्या पोलीस कर्मचा-याकडे देण्यात आला आहे
त्याचा देखील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने या दोन्ही दाखल गुन्ह्याचा तपास निरपेक्षपणे होईल का ? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून, दाखल दोन्ही गुन्ह्यात आरोपीशी संबंध नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी देखील केली जात आहे….
एकीकडे केंद्रात आणि राज्यात महिलांच्या सुरक्षेची ग्वाही देणाऱ्या भाजपा सरकारवर यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पक्ष अशा गुन्हेगारांवर काय कारवाई करणार, असा सवालही नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे भाजपाची प्रतिमा खराब होत असून, अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.