
शिर्डी प्रतिनिधी
आज राज्याचे मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रथमच ठगसेन भूपेंद्र व त्याचे साथीदारांवर आक्रमक भाष्य केले ना विखे म्हणाले कि ह्या सावळे कुटुंबीयांनी राज्यासह शिर्डीतील लोकांना खोटे आमिषे दाखवून शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला
त्यातील मुख्य आरोपीस अटक केली आहे उर्वरित आरोपीन्ना लवकर अटक करण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत प्रामुख्याने ज्या शेकडो लोकांची फसवणूक झाली आहे त्यांनी पुढे येऊन गुन्हे दाखल करायला पाहिजे होते परंतु तसे होतांना दिसत नाही आजवर फक्त २० ते २५ लोकांनीच गुन्हा दाखल केले आहेत
म्हणून ज्या गुंतवणूक धारकांची फसवणूक झालेली आहे त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे तेव्हाच चौकशीत प्रगती होईल आणि जास्तीत जास्त आरोपींना शिक्षा होईल आणि त्याच्या प्रॉपर्टी बाबतही महसूल खात्याला सूचना करण्यात आलेल्या आहेत
ह्या ठकसेनाने कुठे प्रॉपर्टी घेतली असेल तर पोलीस प्रशासनाला कळवावे जेणेकरून गुंतवणूक धारकांचे पैश्यांची कुठे विल्हेवाट लावली हे समोर येईल ह्या आरोपींकडून फसवणूक झालेल्या लोकांना पैशे कशे परत मिळतील याच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नाव. विखे म्हणाले