
शिर्डी प्रतिनिधी /-जिल्हा परीषद प्रा.शाळा सावळीविहीर फार्म येथील शिक्षक योगेश बारकु बोरसे यांची बदली तर नवीन शिक्षक राजेंद्र राणुजी जाधव सर हे हजर झाले या बद्दल नुकताच ग्रामपंचायतीचे सरपंच सौ अर्चना क्षीरसागर , पोलीस पाटील राजेंद्र जमधडे, प्रमोद बेल्हेकर कृर्षी संशोधन केंद्र अधिकारी,

मुख्याध्यापक संदीप घोलप, पत्रकार विजय खरात, सुनील सुरळे, योगेश देसले,साईनाथ झिंजाड, राजेंद्र पवार, अनिल वदक, ज्ञानेश्वर भोंगळे, एकनाथ चव्हाण, अशोक भदे,शंकर मुसळे, आदीसह विविध मान्यवर उपस्थित पार पडला या प्रसंगी बोलताना सरपंच सौ अर्चना क्षीरसागर म्हणाले की आजही शिक्षण श्रेत्रात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढलेली असताना प्रामाणिकपणे केलेल्या ज्ञानदाना मुळे जिल्हा परिषद शाळेत आजही चांगल्या प्रकारे शिक्षण मिळत आहे
त्याचे श्रेय प्रामाणिक पणे काम करणाऱ्या शिक्षकांना जात असून असे शिक्षकच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील भावी पिढीचे आधारस्तंभ आहेत असे मत बोरसे व जाधव
यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना केले
क्षीरसागर पुढे म्हणाल्या की .कोरोना काळात वाडीवस्तीवर जाऊन मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले.गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करुन चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन या शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी आदर्श शिक्षक योगेश बोरसे यांचा मोठा वाटा आहे सत्काराला उत्तर देताना बोरसे म्हणाले की
शिक्षण श्रेत्रात काम करताना या गावाने केलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले यांचे समाधान असल्याचे सांगताना अश्रू अनावर झाले तसेच राजेंद्र जाधव संर यांनी सांगितले की गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम मी करणार यासाठी मी वचनबद्ध आहे यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी गणेश चव्हाण अंगणवाडी सेविका नजराणा शेख, अलकाताई सुरळे, शोभाताई देवकर, गिरजाबाई गांगुर्डे, दत्तात्रय शेलार,माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ आदि उपस्थित होते
