
अहिल्यानगर – महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह शब्द सोशल मीडियावर लिहिणाऱ्या इसमाला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा उदाहरण घालण्यात आले आहे.
🚔 २४ तासांत आरोपीला गजाआड करणारी पोलिसांची शिताफी
कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५३(२), ३५६(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिल्यानंतर, पोनि किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली.
👮♂️ गोपनीय माहिती व व्यावसायिक कौशल्यामुळे आरोपीचा ठावठिकाणा
पथकातील पोलीस कर्मचाऱ्यां
नी गोपनीय माहितीचा व व्यावसायिक कौशल्याचा वापर करून, आरोपी फरीद सुलेमान खान (वय ३०, रा. आलमगिर, भिंगार) याला शोधून काढले. तो वेषांतर करून शहरात फिरत असताना पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
⚖️ कोतवाली पोलीस ठाण्याकडे पुढील तपास सोपविला
आरोपीला कोतवाली पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, व उपविभागीय अधिकारी श्री. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/ दिपक मेढे, श्रे.पोउपनि/ राजेंद्र वाघ, पोहेकॉ/ शाहिद शेख, पोहेकॉ/ सुनिल पवार, पोहेकॉ/ अतुल लोटके, पोहेकॉ/ दिपक घाटकर, पोहेकॉ/ सुयोज सुपेकर, पोहेकॉ/ फुरकान शेख, पोकॉ/ सागर ससाणे, पोकॉ/ अमृत आढाव, पोकॉ/ योगेश कर्डील, पोकॉ/ प्रशांत राठोड, पोकॉ/ प्रमोद जाधव यांनी पार पाडली