Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
अ.नगरराजकीय

निवडणूक निरीक्षक ग्यानचंद जैन यांची माध्यम कक्षास भेट

अहिल्यानगर दि. २२- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानचंद जैन यांनी भेट देऊन माहिती घेतली. श्री.जैन यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

sai nirman
जाहिरात
 यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकुडजोडे, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे समन्वयक अधिकारी अधिकारी डॉ. किरण मोघे, माहिती अधिकारी अमोल महाजन आदी उपस्थित होते. 

 श्री.जैन यांनी माध्यम संनियंत्रण, जाहिरात प्रमाणिकरण, समाजमाध्यमावरील जाहिरातींचे प्रमाणिकरण, खर्च समित्यांशी साधला जाणारा समन्वय, माध्यम केंद्राचे दैनंदीन कामकाज आदीविषयी माहिती घेतली. दूरचित्रवाणी आणि समाजमाध्यमांवरील जाहिरातींच्या संनियंत्रणासाठी माध्यम कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कामकाजाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.  माध्यम कक्षात दररोज येणाऱ्या  विविध वृत्तपत्रांतील बातम्यांची नोंद घेण्याची आणि जाहिरातींचे अवलोकन करण्याची पद्धत याविषयीदेखील त्यांनी जाणून घेतले. 
 जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मोघे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली. 

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button