Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
राजकीय

खा. सदाशिव लोखंडे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या भष्टाचाराचीचौकशी करा डॉ. भारत करडक

शिर्डी प्रतिनिधी/
खासदार सदाशिव लोखंडे यांचा 16 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्रालयाने राबवलेल्या मिशन ऑपरेशन ग्रीन योजने अंतर्गत खासदार लोखंडे यांच्या खेमानंद दूध आणि कृषी प्रोडूसर कंपनी नोंदणीकृत कार्यालय चेंबूर, मुंबई, या संस्थेने नियमांना बगल देऊन ३२ कोटी पेक्षा जास्त रुपयाचे कर्ज घेताना १६ कोटी रुपये अनुदान मिळवले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जागतिक बँक, नाबार्ड,, स्मार्ट, पोकरा आदि केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांद्वारे उत्पादक कंपन्यांना अनुदान दिले जाते. सदर प्रकारआणि जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग झालेला असूनही त्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे. त्यामुळे याची वसूली करावी अशा मागणीचे पत्र स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट व नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉ. भारत करडक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.

kamlakar

सदर शेतकरी उत्पादक कंपनीला दिलेले अनुदान व्याजासह वसूल करण्यात यावे, तसेच या पैशाचा वापर करून अन्य मालमत्ता विकत घेतल्या असतील तर त्याची सक्त वसुली संचालना द्वारे चौकशी करण्यात यावी. यासह मागासवर्गीय घटकांसाठी असलेल्या व्हेंचर कॅपिटल फंड ची वसुली करण्यात यावी, तसेच खा. सदाशिव लोखंडे यांनी अन्य विभागातूनही पदाचा गैरवापर करत सरकारी निधी आणि अनुदान लाटल्याची अन्य प्रकरणे आहेत काय?

याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पुन्हा देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष यांचेकडे करत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच शिर्डी शहरातील शिवसेनेच्या एका शहराध्यक्षाच्या नावावर खासदार लोखंडे साहेबांचा किती प्रॉपर्टयामध्ये सहभाग आहे याची चौकशी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून व्हावी तसेच श्री साईबाबा संस्थान मधील तूप घोटाळ्याची पण चौकशी व्हावी जेणेकरून संसदेमध्ये चारित्र्यवान खासदार जनतेला पाठवता येईल

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button