Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
अ.नगरक्राईम

नशेच्या इंजेक्शन विक्रीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ११-६१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त-एकास अटक

अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन व औषधी बॉटल्या विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी छापा टाकून ११,६१३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईत एक आरोपी अटकेत घेण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात नशेचे इंजेक्शन व प्रतिबंधित औषधांची अवैध विक्री रोखण्याबाबत पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून कारवाई करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दि. २३ जानेवारी २०२६ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास, सिद्धेश्वर मंदिर परिसर, बागडपट्टी, अहिल्यानगर येथे रोहित रघुनाथ वंगार (वय २५, रा. बागडपट्टी) हा इसम डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय विक्रीस प्रतिबंधित असलेली नशेची इंजेक्शन्स व औषधे विक्रीसाठी जवळ बाळगून थांबलेला असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
त्या आधारे पथकाने सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतले. पंचासमक्ष झडती घेतली असता नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण ३७ औषधी बॉटल्या असा ११,२९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासह इतर साहित्य मिळून एकूण ११,६१३ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


या प्रकरणी पोहेकॉ/१६४ गणेश शिवनाथ लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, १२५, २७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button