शिर्डी प्रतिनिधी ग्लो मोअर फायनान्स कंपनीतील आरोपीकडून दिड कोटी रुपये ऑनलाइन घेतल्यामुळे चर्चेत आलेल्या अहिल्यानगर एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर किरणकुमार कबाडी यांची एलसीबीचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. एसपी सोमनाथ घार्गे यांनी हा आदेश काढला आहे.
दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षात अचानक बदली केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी शिर्डीतील ग्लो मोअर फायनान्स कंपनीचा मुख्य आरोपी भूषण सावळे याला दीड कोटी रुपये रक्कम ऑनलाइन मागितल्याच्या आरोपातून पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
या प्रकारामुळे एलसीबीची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगली गेली. तर काल एलसीबीचे प्रमुख तथा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षात एसपी सोमनाथ घार्गे यांनी बदली केल्याने पुन्हा एलसीबी चर्चेत आली. एलसीबीचा पोलीस निरीक्षक पदी चाळीसगाव येथून नव्याने जिल्ह्यात आलेले किरणकुमार कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली.
कबाडी यांचा खमक्या अधिकारी म्हणून नावलौकिक असून राज्याच्या पोलीस दलात अहिल्यानगर एलसीबीची डागाळलेली प्रतिमा सुस्थितीत आणण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
दिनेश आहेर याची सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली होती
त्यास ग्रो मोअर प्रकरणात सह आरोपी करण्यात यावे आहेर याची कार्यकीर्दी अत्यंत खराब राहिली असून जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे वाल्यांपासून तर गुन्हेगारांकडून हफ्ते वसुली करण्याचा धडाकाच लावला होता त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी व अवैद्य व्यवसाय वाढले होते त्याची अनेकदा तक्रार करून देखील त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने अहिल्यानगरच्या इतिहास पहिल्यांदा जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांना ५ दिवस उपोषण करावे लागले होते
तरीही आहेर ची बदली करण्यात आलेली नव्हती कारण आहेर वर तत्कालीन वादग्रस्त व निष्क्रिय पोलीस अधीक्षक राकेश ओलांचा हात होता परंतु नूतन आलेल्या ज्यांची सिंघम म्हणून ओळख आहे असे अति कर्तव्यदक्ष अधिकारी सोमनाथ घार्गे यांनी दिनेश आहेर ची तात्काळ बदली केली आहे परंतु आम्ही काल दिलेल्या अर्जात उल्लेख केला आहे कि
आहेर याची सेवेतून हकालपट्टी व्हावी त्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे आहेर याचा पापाचा घडा भरत आलेला आहे जोपर्यंत त्यावर कारवाई होत नाही जोपर्यंत त्याला जेलची वारी होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे क्यूकी साई कि नगरी मे देर है अंधेर नही