शिर्डी प्रतिनिधी फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिशी, वय 35, धंदा सोने व्यापारी, रा.आवाल घुमटी, ता.अमिरगढ, जि.बनासकाटा, गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी, श्रीरामपूर, कोल्हार, सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले. दि.13/05/2025 रोजी फिर्यादी व त्याचा ड्रायव्हर सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित रा.चौहटन,
जि.बारमेर, राजस्थान असे शिर्डी येथील हॉटेल साई सुनिता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरने 3,26,00,000/- रू किंमतीचे दागीने व रोख रक्कम चोरून घेऊन गेला.याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं.532/2025 बीएनएस कलम 306, 316 (2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे,
अरूण गांगुर्डे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुण चोरीचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. तपास पथकाने घटनाठिकाणी भेट देऊन, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा पुणे, मुंबई येथे शोध घेतला.परंतु आरोपी
हा त्याचे मुळ गावी इब्रे का ताला, ता.चोहटन, जि.बारमेर, राजस्थान येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने राजस्थान येथे जाऊन;सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित रा.चौहटन, जि.बारमरे, राजस्थान (फरार) याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.पथकाने आरोपीचे नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे गांभीर्य समजावून सांगुन आरोपी व गुन्हयातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त
झाल्यास कळविणेबाबत सांगीतले. दि.23/05/2025 रोजी आरोपीचा भाऊ रमेशकुमार भुरसिंह राजपुराहित, वय 33, रा.इब्रे का ताला, ता.चोहटन, जि.बारमेर, राजस्थान हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्याने गुन्हयातील मुद्देमाल हजर करत असलेबाबत कळविले.पथकाने पंचासमक्ष त्याचेकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याने दि.21/05/2025 रोजी शिर्डी येथून चोरून आणलेले सोन्याचे दागीने बॅगमधुन आणुन घरी ठेवले
व तो कोठेतरी निघुन गेल्याची माहिती दिली. पंचासमक्ष रमेशकुमार भुरसिंह राजपुराहित याने हजर केलेले 2,50,59,103/- रू किंमत त्यात 2687.361 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागीने (एसएनपी नग, टॉप्स, डुल, बाळी, मंगळसुत्र वाटया, लेडीज रिंग, राजमुद्रा रिंग) असा मुद्देमाल जप्त केला.गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला होता
मिळालेल्या माहिती नुसार जी रक्कम व सोने आरोपी घेऊन पडून गेला होता ती रक्कम संपूर्ण जप्त करण्यात आलेली होती त्यातील सुमारे ७५ लाख रुपये हे एल सी बीच्या अधिकारी कर्मचारी यांनी हडप केल्याचे दिसून येत असल्याने यातील तपासी अधिकारी दिनेश आहेर व ह्या पथकातील कर्मचारी यांची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे