Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
क्राईमशिर्डी

तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?–आ. संग्राम जगताप

शिर्डी (प्रतिनिधी) श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील देवस्थान मध्ये कामावर असणाऱ्या त्या इतर धर्मीय कर्मचाऱ्यांना ट्रस्टने काढले जर शनिशिंगणापूर ट्रस्ट हा निर्णय घेते तर शिर्डी संस्थान संस्थान परिसरात असणारे हाजी अब्दुल बाबा समाधीच्या देणगी व देखरेख स्वतःकडे घेण्यावर का निर्णय घेत नाही ?

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असा सवाल आता सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही यात विशेष लक्ष घातले असून शनिशिंगणापूर एक झांकी है, लेकिन शिर्डी अभी बाकी है ,असे म्हटले आहे. त्यामुळे आता शिर्डीतील हे प्रकरणही मोठे गाजत असून साई संस्थानने त्वरित निर्णय घेऊन संस्थान परिसरात असणाऱ्या हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी तसेच देखरेख साई संस्थान प्रशासनाने स्वतःकडे घ्यावी

अशी मागणी साईभक्त व तसेच हिंदू समाजाच्या वतीने जोर धरू लागली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शनिशिंगणापूर येथे देवस्थान मध्ये असणाऱ्या इतर धर्मियांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाते. आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या या मागणीला यश मिळते.

आमदार संग्राम जगताप म्हणतात की, जर इतर धर्मियांच्या ठिकाणी हिंदूंचे दुकाने नाही की कर्मचारी नसतात. मग हिंदूंच्या धार्मिक ठिकाणी इतरांना संधी का? असा सवाल करत शनिशिंगणापूर येथील त्या इतर धर्मीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. हे सर्वांचे यश आहे.असे सांगत आमदार संग्राम जगताप यांनी शनिशिंगणापूर एक झाकी है, शिर्डी अभी बाकी है असे यावेळी जाहीर केले.

शिर्डीच्या हाजी अब्दुल बाबा समाधीच्या ठिकाणी येणाऱ्या देणगी पैशावर डल्ला मारणाऱ्यांवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी जाहीर कार्यक्रमात सांगितले की, शिर्डीत साई संस्थांन परिसरात साई समाधी मंदिर तसेच सर्व इतर मंदिरे येथील दानपत्रातील भक्तांनी टाकलेली देणगी साईसंस्थांनला जमा होते.

मात्र संस्थान परिसरातच असणाऱ्या हाजी अब्दुल बाबाच्या समाधीच्या ठिकाणी भक्तांनी दिलेली देणगी ही साईसंस्थानात जमा न होता ती हाजी अब्दुल बाबांचे वंशज समजणारे लोक स्वतः घरी घेऊन जातात. येथे ते आळीपाळीने जणू ड्युटी केल्यासारखे राहतात. व येथील भक्तांनी टाकलेल्या देणगीवर डल्ला मारतात. हे कुठेतरी बंद झाले पाहिजे. यावरही आपण आवाज उठवणार असल्याचे यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

यावर सर्व उपस्थितांनी येथे छत्रपती शिवाजी महाराज की ,जय श्रीराम, जय हनुमान असा जोरदार जय जयकार करत आमदार संग्राम जगताप यांना साथ दिली. आता या प्रकरणाकडे साई संस्थानने ही विशेष लक्ष घालून संस्थान परिसरात असणाऱ्या हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख साईसंस्थानने स्वतः कडे घ्यावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button