Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
क्राईमशिर्डी

साईबाबांची बदनामी = थेट गुन्हा! यु-ट्युबवर विष ओकणाऱ्या अयोध्याच्या स्वामीवर FIR

शिर्डी (प्रतिनिधी):
श्री साईबाबांसारख्या श्रद्धास्थानावर खोटे, अपमानास्पद आणि द्वेष पसरवणारे विधान करणे आता सहन केले जाणार नाही, हे शिर्डीतून ठणकावून सांगण्यात आले आहे.
यु-ट्युबवरील एका चॅनेलवरून श्री साईबाबांची उघड बदनामी करत दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वामी राघवेंद्रचार्य महाराज (रा. अयोध्या, उत्तर प्रदेश) यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📱 डिजिटल माध्यमातून धर्मावर हल्ला!
‘रामलल्ला देवस्थान, अयोध्या’ या यु-ट्युब चॅनेलवर
“क्या है साईबाबा की सच्चाई” अशा चिथावणीखोर शीर्षकाखाली व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता.
या व्हिडीओमध्ये संबंधित स्वामीने कथा सांगण्याच्या नावाखाली श्री साईबाबांविषयी अत्यंत खालच्या पातळीची, असत्य व बदनामीकारक भाषा वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
“भूत की उपासना करोगे तो भूत बनोगे…”
असे वक्तव्य करत थेट शिर्डीच्या साईबाबांवर निशाणा साधण्यात आला, जो प्रकार साईभक्तांच्या भावना दुखावणारा असून सामाजिक सलोख्यास घातक असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
⚠️ लाखो साईभक्तांच्या श्रद्धेवर थेट घाव
या बेताल वक्तव्यामुळे केवळ शिर्डी नव्हे, तर देश-विदेशातील कोट्यवधी साईभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवून समाजात दंगलसदृश वातावरण निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक कट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
🚓 शिर्डी पोलीस ॲक्शन मोडमध्ये
साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे सदस्य रोहिदास अशोक माळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिर्डी पोलिसांनी संबंधित स्वामीविरोधात कायद्याच्या कडक कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.
🛑 थेट इशारा – आता गप्प बसणार नाही!
“साईबाबांची बदनामी करणारा कोणीही असो – बाबा त्याला माफ करणार नाहीत, आणि कायदाही नाही!”
असा स्पष्ट आणि जहरी इशारा शिर्डीतून देण्यात आला आहे.
🚨 सावधान!
📌 यु-ट्युब, फेसबुक, इंस्टाग्रामसह कोणत्याही माध्यमातून
📌 श्री साईबाबांविषयी खोटी, अपमानास्पद किंवा समाजात तेढ निर्माण करणारी भाषा
📌 वापरल्यास थेट गुन्हा दाखल होईल, हे लक्षात ठेवा!

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button