Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
अ.नगरक्राईम

हिंदू मंदिराविषयी द्वेष पसरवणार्‍या इसमाला दहशतवादी घोषीत करा-मागणी

‘हिंदू मंदिरात काम करण्यासाठी जाणे सर्वात मोठे महापाप आहे,तसेच मंदिर वा चर्चमध्ये जाण्यापेक्षा हजारो लोकांना मारणार्‍या शस्त्र बनवणार्‍या कारखान्यात जाणे अधिक चांगले.मंदिर किंवा चर्च येथे ‘शिर्क’ (महापाप) केले जाते.‘शिर्क’ हे इस्लामनुसार महापाप आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

अल्लाहने स्पष्टपणे म्हटले आहे की,मी कोणालाही माफ करू शकतो,पण ‘शिर्क’ केलेल्याला कधीही माफ करत नाही…’, अशी मुक्ताफळे व अनेक आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या इस्लामिक रिसर्च फांऊडेशनचा डॉ.झाकीर नाईक याने ‘हुडा टी.व्ही.’ नावाच्या यू-ट्यूब चॅनलवर मुलाखत देतांना केली आहेत.

kamlakar

यातून कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदू मंदिरांविषयी समाजात जातीय विद्वेष,घृणा आणि शत्रुत्वाची भावना पसरवून आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे दुष्कृत्य झाकीर नाईक याने केले आहे.

त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषीत करण्यासाठी,तसेच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोपरगाव येथे निवासी नायब तहसीलदार श्रीमती प्रफुल्लिता सातपुते यांची तहसील कार्यालयात भेट घेऊन त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे.या वेळी निवेदन देतांना सनी गायकवाड,अशोक नायगुडे,सनी काळे,राहुल चवंडके,प्रसाद निकम,ओमकार जाधव,दत्ता भागिले,विवेक गर्जे,प्रसाद सारंगधर,योगेश रुईकर,आकाश वैद्य हे धर्माभिमानी उपस्थित होते.











केंद्र सरकारने आतंकवादी संघटना म्हणून बंदी घातल्यानंतरही झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशन यांचे फेसबूक, ट्वीटर,इंस्टाग्राम आदी सर्व अनेक सामाजिक माध्यमांवरील सर्व अकाऊंट सुरू आहेत.ती सर्व त्वरित बंद करण्यात यावीत अशा मागण्याही शेवटी करण्यात आली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button