
शिर्डी प्रतिनिधी पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खाडे, व त्यांच्या पथकाने प्रतिबंधीत अन्नपदार्थावर कारवाई करून प्रतिबंधीत अन्नपदार्थसाठा, त्यासाठी वापरात येणारी वाहणे, सदर व्यवसायामध्ये सहभागी असलेल्या इसमाचे विविध कंपन्याचे मोबाईल व रोखरक्कम मिळुन असे एकुण १,०१,७४,७५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आले बाबत कळविले.

तसेच सदर चा मुद्देमाल हा शोएब शावीद काझी याने आतिक उर्फ डॉन मोहम्मद शेख, रा. भिंगार, ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर, याच्या कडुन घेतल्याचे सांगितले आहे. त्यानुसार प्रतिबंधीत अन्नपदार्थ वाहतुक, साठा, विक्री व्यवहार करणारे इसम माझ्या समक्ष हजर केले. हजर इसम नामे १) शोएब शाविद काझी, वय २८ वर्ष, रा. कोतुळ, ता. अकोले, जि. अहिल्यानगर २) शाहिदहुसेन लतिफ पटेल, वय ४१ वर्ष, रा. कोतुळ, ता. अकोले, जि अहिल्यानगर
३) मतिन शब्बीर शेख, वय ३० वर्ष, रा. कोतुळ, ता. अकोले, जि अहिल्यानगर ४) जुबेर युनुस शेख, वय ३० वर्ष, रा. कोतुळ, ता. अकोले, जि अहिल्यानगर, ५) इम्रान रौफ शेख, वय ३२ वर्ष, रा. कोतुळ ता. अकोले, जि. अहिल्यानगर, ६) परवेज युनुस शेख, वय ३१ वर्ष, रा. कोतुळ, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, ७) सादिक इसानउल्ला पठाण, वय ४७ वर्ष, रा. काझी पुरा, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर ८) अमोल शरद जाधव वय २८ वर्ष, रा. काझी पुरा, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर,
९) अतिक अनवर शेख, वय १८ वर्ष, रा. समशेरपुर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, १०) शाहरुख जावेद काझी, वय ३० वर्ष, रा. कोतुळ, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, ११) साद अन्वर तांबोळी, वय २३ वर्ष, रा. कासारगल्ली, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, १२) शहानवाज जावेद काझी, वय २५ वर्ष, रा. कोतुळ, ता.अ कोले, जि. अहिल्यानगर तसेच १३) शेख नुर अब्दुल रऊफ, वय ४२ वर्ष, रा. भिंगार, ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर,
यांच्या कडे चौकशी केली असता पोलीस स्टेशन मध्ये असलेला प्रतिबंधीत अन्नपदार्थ साठा विक्री व्यवहारामध्ये त्याचा सहभाग असल्याचे सांगितले.महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा पानमसाला सुगंधीत तंबाखु सुंगधीत सुपारी व तत्सम अन्न पदार्थांच्या विक्री साठा उत्पादन वाहतुकीस बंदी घातलेली आहे.
त्याबाबत वर नमुद इसमाना / विक्रेत्यांना ज्ञात असुन देखील त्यांनी प्रतिबंधीत अन्नपदार्थाची विकीसाठी वाहतुक करुन महाराष्ट्र शासन यांची अधिसुचना क्र. असुमाआ/अधिसुचना/ ५८१/ २०२४/७ /दि.१२/०७/२०२४ चे उल्लंघन केलेले असल्याचे आढळले.
अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व त्याखालील नियम व नियमने २०११ चे कलम २६ (२) (iv)२७ (३) (d) (e) ३०(२) (a), ३ (१) (zz) सह शिक्षा कलम ५९ नुसार गुन्हा केलेला आहे.
म्हणुन सदर इसम यांचेविरुदध अन्न सुरक्षा व मानदे कायदयातील वर नमुद उल्लंघनाबाबत व भारतीय न्याय संहितेतील होणाऱ्या उल्लंघनाबाबत योग्य त्या कलमानुसार राजेश नामदेव बडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पुढील तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घीर्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपविभागीय अधिकार संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे करीत आहेत