Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
क्राईमशिर्डी

शिर्डीत चैन स्नॅचिंगचा सुळसुळाट!एअरपोर्ट रोडवर दर्शनासाठी निघालेल्या भाविक महिलेवर जबरी चोरी-सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

शिर्डी | प्रतिनिधी
देशभरातून लाखो भाविक श्रद्धेने शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना, भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिर्डी शहरात चैन स्नॅचिंग व जबरी चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याने पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.३० ते ११.५० वाजण्याच्या सुमारास, शिर्डीतील एअरपोर्ट रोडवरील हॉटेल प्राईड इन समोर ही धक्कादायक घटना घडली. फिर्यादी महिला वय ५२ वर्षे, रा. चाथेर, ता. मौदा, जि. नागपूर या आपल्या पती सुब्रमण्यु यांच्यासह द्वारावती भक्त निवास येथे जाण्यासाठी पायी जात असताना, अचानक समोरून आलेल्या दोन अनोळखी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले.
🚨 हेल्मेटधारी चोरट्यांचा थरार
चोरटे मोटारसायकलवर होते. पुढे बसलेला इसम हेल्मेट घातलेला होता, तर मागे बसलेला इसम पूर्ण तयारीनिशी होता. क्षणाचाही अवधी न देता, मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी महिलेच्या गळ्यावर झडप घालून दोन पळ्यांचे मंगळसूत्र व काळ्या मण्यात गुंफलेला लक्ष्मी पेंडल असलेला सोन्याचा हार जबरदस्तीने ओढून घेतला.
या झटापटीत महिला तोल जाऊन खाली पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रसंग इतका अचानक घडला की काही क्षणातच आरोपी राँग साईडने सुसाट वेगात फरार झाले. चोरी गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.
🏃‍♂️ घटनास्थळी एकच गोंधळ, भाविकांमध्ये भीती
घटना घडल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. काही नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेगवान दुचाकीमुळे आरोपी निसटण्यात यशस्वी ठरले.
या घटनेनंतर शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः महिला भाविकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.
📑 जबरी चोरीचा गुन्हा दाखल
या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ कलम ३०९(४) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोसई निवांत जाधव करीत असून, प्रभारी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
👮‍♂️ सलग गुन्ह्यांनी पोलिसांवर दबाव वाढला
महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांत शिर्डी व परिसरात चैन स्नॅचिंग, जबरी चोरी व सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे शिर्डी पोलिसांवर प्रचंड दबाव वाढला आहे.
पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी, संशयित दुचाकींचा मागोवा, बाहेरगावाहून आलेल्या टोळ्यांचा तपास, तसेच हॉटेल परिसर, भक्त निवास, एअरपोर्ट रोड व मुख्य मार्गांवर गस्त वाढवली आहे. स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू आहे.
⚠️ पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांचा ठाम इशारा
“शिर्डीत भाविकांवर हात टाकणाऱ्या चोरट्यांना कोणत्याही परिस्थितीत मोकळे सोडले जाणार नाही.
सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला जात असून, लवकरात लवकर त्यांना जेरबंद केले जाईल,”
असा ठाम विश्वास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी व्यक्त केला आहे.
🔥 भाविकांची मागणी : कडेकोट बंदोबस्त हवा
या घटनेनंतर भाविक व स्थानिक नागरिकांकडून एअरपोर्ट रोड, भक्त निवास परिसर, मंदिराकडे जाणारे मार्ग आणि हॉटेल झोनमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त तातडीने वाढवण्याची मागणी होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button