शिर्डी, दि. १६ :—
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा जणू स्फोटक प्रारंभच झाला आहे. तब्बल नऊ वर्षांनी निवडणूक जाहीर होताच राजकीय समीकरणं तुफान बदलू लागली आहेत. आरक्षणावरून झालेला घणाघात, पक्षातील असंतोष, आणि अचानक निर्माण झालेली राजकीय भूचाल—या सगळ्यात ‘दादा’ यांचं नाव सतत चर्चेत.
याच पार्श्वभूमीवर पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी आज थेट आणि निर्वाणीचा सवाल उपस्थित करत दादांच्या भूमिकेवर तगडा प्रहार केला आहे.
**🔴 “गुन्हेगारांचे मत नको म्हणणारे दादा
आज कोणाला उमेदवार करत आहेत—हे गाव सांगेल!”**
भुजबळ यांनी दादांचीच भाषणं उद्धृत करत जबरदस्त टोला लगावला—
**“दादा म्हणाले होते…
➡️ ‘मला गुन्हेगारांचे मत नको!’
➡️ ‘अवैध धंदे करणारे शिर्डीत राहणार नाहीत!’
➡️ ‘न्याय करणारच!’
पण आज तुम्ही दिलेले उमेदवार नेमके कोण?
गावदयाने सांगेल—
कुणावर कोणते गुन्हे आहेत?
कुठल्या अवैध व्यवसायाशी कोण जोडले आहे?
आणि त्यांना कोण राजकीय संरक्षण देत आहे?”**
या थेट आरोपांमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
**🔴 “दादांची राजकीय भाषा आणि प्रत्यक्ष कृती —
दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध!”**
भुजबळ म्हणतात—
“सभेत बोलताना दादा न्याय, शुचिता, स्वच्छता आणि गुन्हेगारीविरोधी भुमिका मांडतात…
पण उमेदवारी देताना?
ते निकष विसरले जातात.
की दादांच्या भाषणातील ‘नकोत’ या यादीतले लोक आज उमेदवारांच्या पहिल्या रांगेत बसलेत?”
भुजबळांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात अस्वस्थता वाढली आहे.
**🔴 सुकानू समितीच्या शब्दाचा ‘सुद्धा’ अवमान —
“हा शब्दही खोटा ठरला दादा!”**
भुजबळांचे अणकुचीदार शब्द—
**“सुकानू समितीचे सदस्य उमेदवारी मागणार नाहीत—
हा तुमचा शब्दही धुळीत मिळाला.
न्याय सर्वांना समान असायला हवा होता.
पण हट्ट, दबाव आणि आपले लोक यामुळे
त्याची पायमल्ली झाली आहे.”**
**🔴 निष्पाप तरुणाच्या हत्येनंतर वेदना तीव्र —
“दिलेला शब्द मोडल्यामुळे ही हानी अधिक कडू वाटते”**
भुजबळांनी परिस्थितीचे गंभीर चित्र स्पष्ट केले—
**“शब्द पाळला असता…
तर आज एका निष्पाप तरुणाचा बळी कदाचित टळला असता.
या दु:खाची वेदना तुमच्याही शब्दभंगामुळे वाढली आहे,
हे कटू सत्य आहे दादा.”**
🔴 “मी निर्भय पत्रकार — माझं कर्तव्य सांगणं!”
भुजबळ सडेतोड म्हणतात—
**“माझं मत वैयक्तिक आहे.
पण सत्य सांगण्यास पत्रकार घाबरत नाही.
शिर्डीमध्ये गुन्हेगारी पुन्हा माजू लागली तर?
कोण जबाबदार?
व्हाईट कॉलर नेते पडद्यामागून गुन्हेगारांना आधार देतील—
याचं आश्चर्य वाटू नये.
आणि सध्या तेच दिसत आहे.”**
**🔴 ‘साईनगरी’ला कोण वाचवणार?
निवडणुकीआधीच तुफान चर्चा**
या वक्तव्यानंतर शहरात चर्चा तापली आहे.
गल्ल्या–बोळांपासून सोशल मीडियापर्यंत एकच प्रश्न —
“दादांच्या निर्णयामागे नेमकं सत्य काय?”
