शिर्डी प्रतिनिधी शिर्डी शहरात दिवंदिवस गर्दी कमी होत चालली असतांना मात्र चोरटे कमी होण्याचे नाव घेत नाहीत दैनंदिन शिर्डी शहरात महिलांचे मंगळसूत्र ओरबडणे चैन स्नॅचिंग करणे पाकिटे मारणे व उभ्या असलेल्या गाडीतून चोर्या करणे हे प्रकार वाढत चालेले आहे
त्याचा परिणाम शिर्डीच्या गर्दीवर होऊ लागला आहे शिर्डीत दर्शनाला आलेल्या महिला पोलिसांची भररस्त्यावर मंगळसूत्र चोरण्याचा प्रकार झालेलाच आहे त्या पोलीस महिलेने फिर्याद काढलं केली आहे त्यात त्या महिलेने म्हटले आहे कि मी पदमा कृष्णा एलुरु राहणार आंध्रप्रदेश .काल दि. 14/07/2025 शिर्डी दर्शनासाठी मी, माझे पती पनि कुमार, मुलगा बुविन दक्षीत, आई सत्यवती असे आलो होतो.
आम्ही सर्व कुटुंबीय 1000 रुम येथे मुक्कामास थांबलो होतो. आम्ही दर्शन झालेनंतर प्रसादालयात जेवण करुन 1000 रुम समोर असलेल्या रोडचे कडेने मी व माझे पती असे दोघे पायी वॉकींग करत होतो. अंदाजे रात्री 10/00 वा चे सुमारास आम्ही दोघे राहाता कडुन शिर्डी कडे जाणा-या रसत्याचे बाजुने व त्याच दिशेने वॉकींग करत असताना समोरुन दुचाकीवर दोन इसम आले
व त्यांनी काही एक समजण्याच्या आत माझे गळयातील 1,05,000/- रु कि चे 36 ग्रॅम वजानाचे सोन्याचे चैन असलेले मंगळसुत्र हे गाडीवरील मागे बसलेल्या इसमाने बळजबरीने ओढुन हिसकावुन चोरुन घेवुन गेले. तेव्हा आम्ही जोरात ओरडत केली आणि त्यांचे मागे पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु ते खुप वेगाने निघुन गेले. त्यानंतर आम्ही रात्र झालेने आज रोजी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे