कचरा वेगळा करण्याच्या कारणावरून वाद शिर्डीत कचरा व्यवस्थापनावरून वाद, युवक जखमी, दात पडले
शिर्डी – श्री साईबाबा संस्थानच्या कचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन मारहाणीची घटना घडली. या घटनेत एका तरुणाच्या तोंडाला गंभीर दुखापत होऊन दोन दात पडले आहेत. पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
🚮 कचरा वेगळा करण्याच्या कारणावरून वाद
विशाल बाळासाहेब वाघ (वय 20, रा. आंबेडकर नगर, शिर्डी) हा श्री साईबाबा संस्थानमध्ये 1000 रुममध्ये टेंडरअंतर्गत कचरा व्यवस्थापनाचे काम करतो. 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तो कचरा डेपोजवळ काम करीत असताना त्याच विभागातील कृष्णा विजय धेनक हा कचरा गोळा करून आणला. त्या वेळी विशाल वाघ याने “ओला व सुका कचरा वेगळा कर” असे सांगितल्याने वाद उफाळला.
🩸 युवक जखमी, दात पडले
वाद वाढल्याने आरोपी कृष्णा धेनक याने हातातील डस्टबीन जोरात विशालच्या तोंडावर मारला. या हल्ल्यात विशालच्या तोंडातून रक्त येऊ लागले तसेच दोन दात पडले. यानंतर आरोपीने फरशी पुसण्याच्या वायपरच्या दांड्याने दोन्ही हातांवर मारहाण केली आणि शिवीगाळ केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
👮 पोलिसांत फिर्याद दाखल
हल्ल्यानंतर विशाल वाघ याने आपल्या भावाला फोन करून मदत मागवली. त्यानंतर तो पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी साईनाथ हॉस्पिटलमध्ये पाठविले. उपचारानंतर तब्येत सुधारल्याने त्याने पोलीस ठाण्यात हजर राहून आरोपी कृष्णा विजय धेनक (रा. चाचनळी, ता. कोपरगाव) याच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि चैन चोरीबाबत फिर्याद दाखल केली आहे.