
शिर्डी —
बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिने अभिनेते व निर्माते झायेद खान यांनी आज सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. समाधान आणि भक्तीच्या वातावरणात त्यांनी साईबाबांच्या चरणी साष्टांग नमस्कार करत विशेष प्रार्थना केली.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी झायेद खान यांचा शॉल, श्रीफळ व साईचित्र देऊन सत्कार केला.
यावेळी झायेद खान यांनी शिर्डीच्या पवित्र वातावरणाबद्दल समाधान व्यक्त करत, “साईबाबांच्या दर्शनाने मनाला अपार शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली,” अशी भावना व्यक्त केली.
DN SPORTS
शिर्डीतील भाविकांनीही त्यांच्या भेटीबद्दल उत्सुकता व्यक्त केली.