
शिर्डी प्रतिनिधी

शिर्डी शहराची लकसंख्या तशी पटलावर पन्नास हजार आहे मात्र यापैकी मुळचे शिर्डी ग्रामस्थ आणि रहिवासी फारच कमी उरले आहे कारण बदलत्या काळानुसार त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य उच्च शिक्षक्षणाच्या जोरावर केंद्रात, राज्यात तसेच अनेक देशात मोठया पदावर नौकरीच्या माध्यमातून शिर्डीचं तसेच आपल्या कुटुंबाच नावं लौकिक केलं आहे.
शिर्डीतील कोते परिवारातील अनेक तरुणांनी केंद्रात, राज्यात काम करत असताना कोणी पोलीस ऑफिसर, कोणी रिझर्व बँकेत ऑफिसर तर अनेकजन वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत, शिर्डीतील नागरे कुटुंबातील अभिषेक नागरे हा शिर्डीतील पाहिला न्यायाधीश झाला तर राजेंद्र कोते हे पहिले पोलीस निरीक्षक झाले आहेत
तर अनेक मुलं, मुली अमेरिका, रशिया, इंग्लंड, दुबई, जर्मनी यासारख्या मोठ्या देशात चांगल्या कंपनीत जॉब करत आहे. यामागे आई वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन व मुला मुलींनी केलेला अभ्यास व मेहनत हेच मुख्य कारण आहे. मात्र डोक्यावर वडिलांचे छत्र नाही आई एक साधी गृहिणी असूनही आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अंगावरील दागिने गहाण ठेऊन त्यांना उच्च शिक्षित केलं,
आणि याची जाणीव ठेवून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चैत्यन्य संजय कोते याने शिक्षण आणि मेहनतीच्या जीवावर शिर्डीतील पाहिला नेव्ही ऑफिसर होण्याचा मान मिळावीला. यामागे त्याचा संघर्ष आणि आईचा त्याग आणि त्यातून मिळालेलं मोठं याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर होत आहे. चैतन्या नुकतीच ट्रेनिंग घेऊन शिर्डीतील आपल्या घरी परातला,
त्यावेळी त्याचा नेव्हीचा पंधरा शुभ्र पोशाख, डोक्यावर गोल टोपी हे आकर्षण होते मात्र तो जसा गाडीच्या खाली उतरला त्याअगोदर शिर्डीतील प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, रविंद्र कोते, दत्तात्रय कोते, रमेश गोंदकर, चैतन्यचे वर्गमित्र, शेजारी, नातेवाईक यांनी गुलाबाच्या फुलांचा गालिचा जमिनीवर केला होता,
व त्यावरून चैतन्य परेड करत चालत आला व एक कडक ग्रँड सॅल्यूट आपल्या आईला केला व आपल्या डोक्यातील टोपी आईच्या डोक्यावर परिधान केली, यावेळी ती आईच आणि तीने हे आपल्या मुळाचे रूप पाहून त्याच्या गळ्यात पडून रडू लागली, हा हृदयस्पर्शी प्रसंग पाहून अनेकजन भावुक झाले. त्यानंतर त्याचा अनेक मान्यवरांनी सत्कार करून आपले मनोगत व्यक्त केले.
शिर्डी गावात त्याचा अनेक ठिकाणी सत्कार केला जात आहे आणि असाच प्रसंगाचा अभिमान मनात ठेऊन शिर्डीचे मा. उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील यांनी आपल्या राहात्या घरी बोलावून चैतन्यचा मोठा सत्कार केला. शेळके पाटील म्हणाले कि,
शिर्डीच्या वैभवात भर घालताना चैतन्य हा पाहिला नेव्ही ऑफिसर झाल्याचा आम्हाला अभिमान अशा भावना व्यक्त केल्या.तर शेतकरी कुटुंबातील एका आईच्या संघर्षमय मेहनतीचे चैतन्य हे प्रतीक आहे, याचा आदर्ष प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन अभय शेळके पाटील यांनी तरुणांना केलं.