Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
क्राईमशिर्डी

साई संस्थांनचा सशुल्क दर्शन पास बनावट करून साईभक्तांना सोडणाऱ्या सागर आव्हाड यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे साई दर्शनासाठी साई संस्थांनचा सशुल्क बनावट दर्शन पास बनवून साई भक्तांना दर्शनाला सोडण्याच्या प्रयत्नात असताना सदरचा पास बनावट असल्याचे लक्षात आल्याने हा बनावट दर्शन पास फाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सागर रमेश आव्हाड याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
स्वतः साई संस्थान सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

साई संस्थान तसेच साई भक्तांची यापुढे अशी फसवणूक होऊ नये. तसेच फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा व्हावी या उद्देशाने ही फिर्याद पीएसआय रोहिदास माळी यांनी दाखल केली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील साई संस्थांनच्या सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,


मी रोहिदास अशोक माळी, वय 34 वर्षे, धंदा नोकरी, पोलीस उपनिरिक्षक तथा संरक्षण अधिकारी श्री साईबाबा संस्थान मी दि. 19/02/2024 रोजी पासून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी, येथे संरक्षण अधिकारी म्हणून, मा. पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथून प्रतिनियुक्तीवर नेमणूकीस आहे.

साईबाबा संस्थान ची सुरक्षा व्यवस्था बघणे तसेच, संस्थानची चल अचल मालमत्तचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने साईबाबा मंदीराचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त पॉईंट नेमण्यात आलेले आहेत.
श्री साईबाबा समाधी दर्शनाकरीता गेट क्र. 06 ने सशुल्क प्रवेश असून, गेट क्र. 07 ने मोफत दर्शन सुविधा उपलब्ध आहे. सशुल्क गेट क्र. 06 ने दर्शनाला जाणेकरीता 200 रू प्रति व्यक्ती शुल्क आहे.

पास काढून भक्त दर्शनाकरीता जात असतांना माहीती तंत्रज्ञान विभाग व संरक्षण विभागाचे कर्मचारी यांचेकडून पासची पडताळणी केली जाते. तसेच काही संस्थान व बाहयस्त्रोत कर्मचारी गेट क्र. 01,02,04 ने पास काढून घेवून त्यांचे ओळखीचे साईभक्त दर्शनाकरीता घेवून जात असतात. सदर पासची गेट वर सुरक्षा कर्मचारी पडताळणी करून दर्शनाला प्रवेश देत असतात.दिनांक 21/12/2024 रोजी मी नेहमीप्रमाणे 10.00 वा ऑफीसला आलो असता, सकाळी 11/10 वा चे सुमारास गेट क्र. 04 वर कर्तव्याला असणारे अरूण सुपेकर

यांनी वॉकीटॉकी वरून संदेश दिला की, श्री साईबाबा संस्थान प्रकाशने विभागाचे एक बाहयस्त्रोत कर्मचारी दर्शनाकरीता साईभक्त घेवून आला असून, तो दाखवत असलेला पास बनावट असल्याचा मला संशय आल्याने मी ताब्यात घेणेचा प्रयत्न केला असता, त्याने पास फाडणेचा प्रयत्न केला आहे. असे सांगितलल्याने तात्काळ सदर व्यक्तीस संरक्षण ऑफिस येथे घेवून येणेबाबत सांगितले.


नमूद इसमास संरक्षण कार्यालयात आल्यावर त्याने त्याचे नाव सागर रमेश आव्हाड, रा. नाशिक असून सध्या बेटर कम्युनिकेशन लिमिडटेड, मुंबई या कंपनी मार्फत, श्री साईबाबा संस्थान विभागामार्फत प्रकाशने विभागात, डीटीपी ऑपरेटर म्हणून काम करत आहे. सदर विभागाचे प्र. अधिक्षक श्रीमती सुनिता सोनवणे आहेत. त्याने अशी माहीती दिली. त्याने बनावट बनवलेला दर्शनपास फाडल्याचा प्रयत्न केल्याने तुकडे एकत्र करून पाहीले असता,

सदर बनावट दर्शन पासवर दिनांक 21/12/2024, भक्ताचे नाव Ajay singh पासचा क्यू आर कोड- DRW2604A422PY] असा आहे. सदर पास बाबत माहीती तंत्रज्ञान विभाग, श्री साईबाबा संस्थान येथे चौकशी केली असता, सदरचा पास श्री साईबाबा संस्थानच्या अधिकृत पोर्टल वरून वितरीत केला नसल्याचे समजले आहे. श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी, श्री. विश्वनाथ बजाज यांनी बेटर कम्युनिकेशन लिमिडटेड, मुंबई कंपनीला तोंडी कळवून त्यांस तात्काळ कामावरून काढून टाकले आहे.

त्यानंतर आज रोजी मा. प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान, विश्वस्तव्यवस्था यांचे मान्यतेने शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून
या बाहयस्त्रोत कर्मचारी नामे सागर रमेश आव्हाड वय-30 वर्षे रा. नाशिक याने श्री साईबाबा समाधी दर्शनाचा बनावट दर्शन पास बनवला. तसेच गेट क्र. 04 ने साईभक्तांना प्रवेश देत असतांना आपला दर्शनपास बनावट असल्याचे सुरक्षा कर्मचारी यांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ बनावट दर्शनाचा पास फाडला आहे.

तरी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था येथे साईभक्तांचे सशुल्क दर्शन घेणेकरीता स्वतः कुठेतरी बनावट दर्शन पास बनवून श्री साईबाबा संस्थान ची आर्थिक फसवणूक करणेचे उद्देशाने भक्त दर्शनाला सोडले आहेत, सदरचा पास बनावट असल्याचे लक्षात आले असता ‌हा बनावट पास फाडल्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सागर रमेश आव्हाड, वय- 31 वर्षे रा. नाशिक यांचे विरोधात भा. न्या.सं. कलम-318(4), 335, 336(2), 340(2), 238 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button