Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
क्राईमशिर्डी

महिलेवर अत्याचार गुन्हा दाखल,आरोपी अटक !

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका ३४ वर्षीय महिलेवर गेली एक वर्षे आरोपी रात्रीच्या सुमारास घरात घुसून शारीरिक अत्याचार करत असून तिच्या सहनशीलतेचा कडेलोट झाल्यावर तिने नुकताच शहाजापूर येथील आरोपी ज्ञानेश्वर जगन मोरे याचे विरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने शाहाजापुर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे,




















ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून जात असली तरी तरी नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या जास्त आहे.खालील आकडेवारीवरून एक नजर टाकली तर स्त्री अत्याचाराचे भीषण वास्तव दिसून येईल.स्त्रियांवरील अन्याय/अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच.



















या पातळीवर समाधानकारक होत असल्याचे दिसत नाही परिणामी या गुन्ह्यात वारंवार वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना दिनाक ०२ जून २०२५ रोजी उघड झाली आहे.या बाबत बाधित महिलेने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हाच सदर बाधित महिलेने म्हंटले आहे की,आपण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या एक लहान मुलांसह राहत असून आरोपी ज्ञानेश्वर मोरे याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून व आपल्या घरी येवून तिच्यावर बळजबरी करून शारीरिक संबंध करत असून तसेच आपल्या घरात लहान मुलगा असून आपण दोघेच राहत आहे.

द्यानेश्र्वर मोरे हा रात्री १२ च्या सुमारास आपल्या घरात घुसून तो शारीरिक अत्याचार करत आहे.आपण विरोध केला असता तो आपल्याला मारझोड करत आहे.दरम्यान तो आपल्या मुलास जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१६९/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३७६ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,महिला पोलिस उपनिरीक्षक व्हि.ए.मुकणे आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुकणे या करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button