Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरराजकीय

विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते प्रकाशन माध्यमांना निवडणूक विषयक संदर्भांसाठी पुस्तिका उपयुक्त- मुख्य सचिव

शिर्डी, :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आहिल्यानगर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आले. माध्यम प्रतिनिधींना निवडणूक विषयक संदर्भांसाठी पुस्तिका उपयुक्त असल्याचे श्रीमती सौनिक यावेळी म्हणाल्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याप्रसंगी महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते.

आहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाने माध्यम प्रतिनिधींच्या सुलभ संदर्भासाठी या पुस्तिकेची निर्मिती केली आहे. निवडणूक आचारसंहितेबाबत तरतुदी, निवडणूक वार्तांकनासाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे, न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल स्टँडर्डस् ऑथॉरिटीच्या (एनबीडीएसए) मार्गदर्शक सूचना, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाची (आयएमएआय) स्वैच्छिक आचारसंहिता आदींबाबत सविस्तर माहिती या पुस्तिकेत दिली आहे.

राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे कामकाज (एमसीएमसी), पेड न्यूजबाबत तरतुदी आदी उपयुक्त माहितीही या पुस्तिकेत आहे.

सन १९५१ च्या निवडणुकीपासून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील उमेदवार त्यांना झालेले मतदान, मतदार संख्या, वैध मतांची संख्या, मतदानाची टक्केवारी यांचाही पुस्तिकेत समावेश असल्याने ही पुस्तिका माध्यम प्रतिनिधींना संदर्भासाठी उपयुक्त आहे.

माध्यमांच्या माहितीसाठी जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांचे समन्वय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, मतदार मदत कक्ष, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष यांचे दूरध्वनी क्रमांक, आयोगाच्या विविध तंत्रज्ञान सहाय्यित उपयोजक (ॲप), पोर्टल आदींची माहितीही यात देण्यात आली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button