Letest News
‘विखेंनी साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगावे!’ – नगर–मनमाड रस्त्यावर निलेश लंके यांचा थेट हल्ला साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थ... १५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्...
क्राईम

साई दर्शनासाठी येतांन साईभक्तांच्या मारुती व्हॅनला लागली आग!

येवला (प्रतिनिधी )मारुती व्हॅन कारमध्ये गॅस भरताना आग लागल्याची खळबळ जनक घटना येवल्याच्या मुलतानपुरा भागात घडली असून आगीत १० प्रवासी भाविक जखमी झाले आहे. त्यात तीन लहान बालक आणि एका महिलेचा समावेश असून काहींना उपजिल्हा रुग्णालय तर काहींना खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. चालक अवैध गॅसच्या अड्डयावर गॅस भरण्यासाठी मारुती घेऊन गेला होता .गॅस भरत असतांना ही घटना घडली. जखमी झालेले सर्व प्रवासी नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथील असल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथून शिर्डीतील साई दर्शनासाठी आलेलं कुटुंब नगरसुल रेल्वे स्टेशनवर दाखल झाले होते. यावेळी नगरसुल येथून दुसऱ्या खाजगी वाहनाने ते येवल्यात आले. येवल्यातून शिर्डीसाठी त्यांनी एक मारुती व्हॅन कार भाडोत्री घेतली होती. या कारमध्ये गॅस भरत असताना हा भीषण स्फोट झाला. येवला शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या पक्की मज्जिद भागामध्ये ही घटना घडली आहे. जखमींमध्ये 10 व्यक्तींचा समावेश असून चार लहान बालके आहेत. यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.चालकाने येवल्यात आल्यानंतर एका ठिकाणी सुरु असलेल्या अवैध गॅसच्या अड्डयावर गाडी घेऊन गेला. तेथे गॅस भरत असतांना अचानक आग लागली. आग लागल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणून जखमीना हॉस्पिटल मध्ये दाखल केले घटनेनंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button