Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
Blog

विश्वविजयाच्या शिखरावरून साईचरणी नतमस्तक — भारतीय महिला अंध क्रिकेट संघाची शिर्डीत भावस्पर्शी उपस्थिती

विश्वविजेती भारतीय महिला अंध क्रिकेट संघाची शिर्डीत साईबाबांच्या चरणी कृतज्ञ नतमस्तक 🙏
ऐतिहासिक T-20 वर्ल्ड कप विजयानंतर साई दर्शनाने विश्वचॅम्पियनचा अध्यात्मिक सोहळा
शिर्डी | प्रतिनिधी
टी-20 वर्ल्ड विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत संपूर्ण देशाचा मान उंचावणाऱ्या भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने आज श्रीक्षेत्र शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
मैदानावर जिद्द, आत्मविश्वास आणि संघभावनेचा आदर्श घडवणाऱ्या या विश्वविजेत्या संघाने आज अध्यात्मिक श्रद्धेचा देखील आदर्श ठेवत साईबाबांच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक झाले.
🌍 “विश्वचॅम्पियन बनण्याचा आनंद शब्दात मांडता येणार नाही” – दीपिका टी. सी.
संघाची कर्णधार दीपिका टी. सी. यांनी साई दर्शनानंतर ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की,
“आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि भावनिक क्षण आहे. भारतीय महिला अंध क्रिकेट संघ आज विश्वचॅम्पियन टीम बनली आहे. या यशासाठी साईबाबांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहिले.”
🏏 संघाच्या यशामागे संघटनेची ताकद – शैलेंद्र यादव
संघाच्या या ऐतिहासिक यशामध्ये मोलाची भूमिका बजावणारे महासचिव शैलेंद्र यादव यांनी सांगितले की,
“आज संपूर्ण टीम साईबाबांच्या दर्शनासाठी आली असून सर्व खेळाडूंनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्हाला अपार आनंद झाला आहे.”
🌸 साई संस्थानकडून विश्वविजेत्यांना सन्मान
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी स्वतः पुढाकार घेत टीममधील सर्व खेळाडूंना साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घडवले.
विश्वविजेत्या खेळाडूंना साईनगरीत मिळालेल्या या सन्मानामुळे वातावरण भक्तीमय व प्रेरणादायी झाले होते.
✈️ प्रवासातील योगायोग… आणि साई दर्शनाचा सोनेरी क्षण
विजयानंतर जालना येथे संघाचा सत्कार सोहळा पार पडला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून विमानाने दिल्लीला जाण्याचा संघाचा नियोजित प्रवास होता.
मात्र सर्व विमानं रद्द झाल्याने संघ कारने मुंबईकडे रवाना झाला.
दरम्यान, जेवणासाठी एका हॉटेलवर थांबल्यानंतर शिर्डी अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती मिळताच संपूर्ण संघ आनंदाने भारावून गेला आणि तिथून थेट साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाला.
🇮🇳 देशभरातून कौतुक आणि सन्मानांचा वर्षाव
टी-20 वर्ल्ड कपमध्ये मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय महिला अंध क्रिकेट संघाचे देशभरातून कौतुक होत आहे.
ठिकठिकाणी संघाचा सन्मान केला जात असून, या खेळाडूंनी दिलेली जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेची

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button