श्री देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते. ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://shritul jabhavani.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे.माहे जुलै २०२५ मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल – याची सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी, सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी.

भाविकांनी सिंहासन पुजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://shritulja bhavanitempletrust.org यावर सिंहासन पुजा नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत होती.माहे जुलै-२०२५ या महिन्यात सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
भाविकांनी सिंहासन पूजेसाठी http://shrituljabhavanite mpletrust.org यावरून सिंहासन पूजा पास बुकिंग या मेन्यूवर क्लीक केल्या नंतर https://shrituljabhava nimataseva. org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी.
सिंहासन पुजा नोंदणी २१ जुन २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासून सुरू झाली आहे. ती २६ जुन २०२५ रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २७ जुन २०२५ रोजी १०.३० वाजता पाठविण्यात येतील. भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २७ जुन २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजतापासून ते २८ जुनपर्यंत सकाळी १० वाजतापर्यंत करावे.
सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २८ जुन २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील.
भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २८ जुन २०२५ रोजी सकाळी १०.३० ते २९ जुन रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावे. प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २९ जुन रोजी सकाळी १०.३० वाजतापर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील.
भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २९ जुन रोजी सकाळी १०.३० ते ३० जुन रोजी रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करावे.माहे जुलै-२०२५ या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी ३० जुन रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.
भाविकांनी वरीलप्रमाणे सिंहासन पुजा नोंदणीचा लाभघ्यावा. असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर, संस्थान तुळजापूर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांन केले आहे