राहाता-शिर्डी दरम्यान फाउंटन हॉटेलजवळ नगर-मनमाड रोडवरील अंडरग्राउंड चर वरून प्रचंड पाणी वाहून गेल्याने दोन तरुणांचे बळी गेले. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून परिस्थिती बिकट झाली होती.
🚨 रोहित खरात मोटरसायकलसह वाहून गेले
रोहित ढगू खरात (रा. १५ चारी, राहाता) हे मोटरसायकलवरून जात असताना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. शोधमोहीम सुरू करून अखेर त्यांचा मृतदेह मिळून आला. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
🚨 प्रसाद विसपुते यांचा मृतदेह मिळाला
प्रसाद पोपटराव विसपुते (रा. कोपरगाव) हे कालच मोटरसायकलसह पाण्यात वाहून गेले होते. शोधानंतर यावेळी त्यांचा मृतदेह मिळाला. परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.
👥 शासनाने मदत द्यावी, अशी मागणी
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
🙏 दिवंगत आत्म्यांना दैनिक साईदर्शन परिवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली.