🗓 लोणी | प्रतिनिधी
“देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप रोया!”
या चित्रपटातील ओळी आज प्रवरेच्या हजारो शेतकरी व कामगारांच्या वास्तवात उतरल्या आहेत!
दिवाळीचा सण — पण प्रवरेत घराघरात अंधार. कारण विखे पिता–पुत्रांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचा घामाचा पैसा आजतागायतही खात्यावर पोहोचलेला नाही!
💥 उसाचे पैसे थकले – शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा!
राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी कोटी कोटींचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले, तर प्रवरेचा शेतकरी अजूनही बँकेकडे डोळे लावून बसलेला.
मागील वर्षी कबूल केलेले ₹300 प्रति टन पेमेंट आजतागायत न मिळणे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे की लुट – हा प्रश्न शेतकरी विचारतोय.
⚡ व्याजाचे पेमेंट – तोंडाला पाने पुसण्यासारखे!
प्रवरा कारखान्याने फक्त काही लाखांचे नगण्य व्याज दिले. ज्यांचे शेअर्स अपूर्ण, त्यांना व्याज नाही.
व्याज मिळालेले शेतकरी मोजकेच. बाकी सर्वांकडे फक्त रिकामी खात्रीपत्रे आणि तुटलेली स्वप्ने.
🧨 कामगारांचाही हक्क हिरावला; बोनस म्हणजे थट्टा!
कारखान्यातील बहुतांश मजूर कंत्राटी. बोनस नावालाच. काही महिन्यांचे पगार अजूनही थकीत.
“ना बोनस, ना पगार – आणि वरून दिवाळीच्या शुभेच्छा!”
हा विखे पिता–पुत्रांचा कारभार शेतकरी व कामगारांवर जखम करणारा आहे, असे प्रवरा शेतकरी मंडळाने ठणकावले.
🏛️ शिवपुराण की शेतकऱ्यांची उधारी पुराण?
ऐन दिवाळीत अमित शहा यांच्या सभांसाठी व शिवपुराण कथेवर तब्बल 15 ते 20 कोटींचा उधळपट्टीचा खेळ!
मांडव, जेवण, पुतळे, गाड्या – कोटींच्या रकमांची माळा.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूर आणि विखेंच्या सभागृहात दिवे!
प्रवरा शेतकरी मंडळाचे नेते संतप्त –
“शेतकऱ्यांच्या पैशावर राजकीय तमाशा उभारणाऱ्यांना आम्ही जाहीरपणे विचारतो — हा कारखाना शेतकऱ्यांचा की विखेंच्या महालाचा?”
💰 चारशे कोटींचा निधी पडून; शेतकऱ्यांना मात्र थकीत पेमेंट!
केंद्राकडून मिळालेले ₹400 कोटी आजही न वापरलेले, पण विखेंनी मात्र पुतळ्यांच्या उद्घाटनात कोटींचा चुराडा केला.
जर त्या पैशातून काही रक्कम शेतकऱ्यांना दिली असती, तर आज प्रवरेत “काळी दिवाळी” नसती – अशी तीव्र प्रतिक्रिया निषेधकर्त्यांनी दिली.
🗣️ “विखे घराण्याला शेतकऱ्यांचे सुख कधीच नको!” — शेतकरी संघटनांचा हल्लाबोल!
प्रवरा शेतकरी मंडळाने स्पष्ट शब्दात जाहीर केले –
“चार पिढ्या गेल्या पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही.
त्यांच्या तोंडचा घास हिरावणाऱ्यांचा आम्ही सार्वजनिक निषेध करतो!
अजूनही त्यांच्यात जरा लाज उरली असेल तर, त्यांनी शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट तात्काळ करावे!”