
स्थानिक गुन्हे शाखेने माझ्याकडून लाच म्हणून घेतलेले दिड कोटी रुपये परत द्यावे, अशी मागणी भूपेंद्र सावळेने राहाता न्यायालयात केली. त्याच्या वकीलांनी थेट पोलीस आयुक्तांकडे अर्ज दाखल केल्याने ग्रोमोर घोटाळ्यातील खटल्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या कारवाईतून वाचवण्यासाठी लाचखोर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तुषार धाकराव याच्यासह पाच पोलिसांनी लाचेपोटी स्वीकारलेले दिड कोटी रुपये परत मिळावे यासाठी भूपेंद्रचे वकील बी. ए. हुसळे यांनी नाशिक विभागीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे रितसर अर्ज दाखल केला आहे.
ग्रोमोर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे याला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अडवून आम्हाला दिड कोटी रुपये दे नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकतो असे धमकावल्याने सावळेने तुषार धाकराव यांच्या पथकाला दिड कोटी रुपयांची लाच दिली होती.
याचा भांडाभोड भूपेंद्रला अटक झाल्यानंतर त्त्याने केला होता. सदर घटना अकार्यक्षम पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या काळात घडली होती. त्यानंतर ओला यांच्या जागी आलेले सोमनाथ घार्गे यांनी पोलीस खात्याची बदनामी होऊ नये म्हणून तुषार धाकराव याच्यासह पाच पोलीस निलंबीत केले होते.
पोलिसांचे निलंबन झाले असले तरी दिड कोटी कुणाच्या खिशात गेले? त्या दिड कोटीचे लाभार्थी कोण? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. ह्या प्रकरणी दैनिक साईदर्शनाने राज्याचे पोलीस महासंचालक सह संबंधित विभागांना अर्ज केला होता कि आहिल्यानगरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनाही दोषी धरून तात्काळ निलंबित करून त्यावर देखील बडतर्फेची कारवाई व्हावी असे लेखी अर्ज दिले आहे