Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
राजकीयशिर्डी

मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. रुपाली निलेश चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या अचानक निर्णयामुळे पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकणकर यांनी आपला राजीनामा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीय व पक्ष नेतृत्वाकडे सोपवला असून, राजकीय वर्तुळात याचे मोठे पडसाद उमटत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🔥 खरात प्रकरणाने घेतली टर्निंग पॉईंट
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चाकणकर यांच्यावर दबाव वाढत होता. या प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत असल्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा होती.
याच पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी अखेर पदाचा राजीनामा देत जबाबदारी स्वीकारल्याचे बोलले जात आहे.
⚡ पक्षात तणाव वाढणार?


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आधीच विविध मुद्द्यांवरून अंतर्गत मतभेद सुरू असताना, हा राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महिला आघाडीच्या नेतृत्वात आता मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
🗣️ राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
या निर्णयानंतर राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनीही या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
👉 राजीनाम्यामुळे खरात प्रकरणाचा राजकीय फटका स्पष्ट दिसत असून, पुढे आणखी कोणते मोठे निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button